आंतरराष्ट्रीय योग संमेलन गोव्यात

अवित बगळे
शनिवार, 26 मे 2018

पणजी  : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त घेण्यात येणारे आंतरराष्ट्रीय योग संमेलन यंदा पणजी लगतच्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये घेण्यात येणार आहे. प्रथमच हे संमेलन गोव्यात भरवण्यात येत आहे, अशी माहिती केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांनी आज येथे पत्रकार परीषदेत दिली. 

केंद्र सरकारच्या चार वर्ष झाल्यानिमित्ताने बोलताना ते म्हणले, आयुष मंत्रालयाकडून गोव्याला भरभरून देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येकी 50 खाटांची दोन जिल्हा इस्पितळे बांधण्यात येत असून एम्सच्या धर्तीवर आयुर्वेदातील संशोधन केंद्र व शंभर खाटांचे इस्पितळही गोव्यात बांधण्या येत आहे. येत्या 15 दिवसानंतर त्याची सुरवात केली जाईल. केंद्र सरकारने चार वर्षात किमान 30 हजार कोटी रुपयांची मदत गोव्याला या ना त्या मार्गाने केली असून गोवा मुक्तीनंतर प्रथमच एवढी मदत मिळाली आहे. 

समाजाच्या प्रत्येक घटकाला काही ना काही देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला आहे. प्रत्येक समाज घटकासाठी योजना राबविल्या आहेत असे सांगून ते म्हणाले, केंद्र सरकारवर 4 वर्षात गैरव्यवहाराचा एकही डाग लागलेला नाही हे आमचे बलस्थान आहे. सर्वाना सोबत घेत विकासाकडे झेपवायचे या तत्वावर या सरकारची वाटचाल सुरु आहे.

 गोव्यात आजपासून 15 दिवस भाजपने जनसंपर्क मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेदरम्यान केंद्र सरकारच्या विविध योजना आणि विकासकामे यांची माहिती नेते जनतेला देणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर आणि सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांच्या नेतृत्वाखाली त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

Web Title: international yoga festival in gova