इंटरनेटने लोकांना ठेवले लॉकडाउन

Internet
Internet

नवी दिल्ली - गेल्या दीड महिन्यांपासून देशात लॉकडाउन असल्याने इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. भारतातच नाही तर जगात नेट वापराचा आलेख हा वाढलेला दिसून येत आहे. वर्क फ्रॉम होम, व्हीडिओ कॉलिंग, नेटबँकिंग, सोशल मीडियाच्या वाढत्या प्रस्थमुळे इंटरनेट यूजरची संख्या लक्षणीयरित्या वाढलेली दिसून येते.

याशिवाय डिजिटल जाहीरातीला सुगीचे दिवस आले आहेत. गेल्या बारा महिन्यात जगभरात ३०० दशलक्ष यूजरची नव्याने भर पडली आहे. ग्लोबल इंडेक्स कोरोना व्हायरस मल्टी मार्केट स्टडीच्या माध्यमातून ३१ मार्च २०२० ते २ एप्रिल २०२० या तीन दिवस जगातील १७ देशातील यूजरचा ऑनलाइन सर्व्हे करण्यात आला. यात भारत, अमेरिका, ब्राझील, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, चीन, कॅनडा आदी देशांचा समावेश आहे. हे सर्व्हेक्षणात १६ ते ६४ वयोगटातील व्यक्तींचा समावेश होता.

विशेष म्हणजे इंटरनेट वापरणाऱ्यात महिलांचे प्रमाण वाढले असून १६ ते २४ वयोगटातील दोन तृतियांश महिला सोशल मीडियावर सक्रिय दिसून येतात.

लॉकडाउनच्या काळात ऑनलाइन पाहणाऱ्यांचे वाढलेले प्रमाण

  • दूरचित्रवाणीवरील मालिका, स्ट्रिमिंग सर्व्हिंग - 57%
  • सोशल मीडिया - 47%
  • मेसेंजर सेवेचा वापर - 46%
  • ऑनलाइनवर संगीत ऐकणे - 39%
  • मोबाइल ॲप्स वापरणारे - 36%
  • संगणकावर खेळणे, व्हीडिओ गेम्स - 35%
  • व्हीडिओ तयार करून अपलोड करणारे - 15%
  • पॉडकास्ट वापरणारे - 14%

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com