येत्या 48 तासांत इंटरनेट सेवा होणार ठप्प ?

येत्या 48 तासांत इंटरनेट सेवा होणार ठप्प ?

नवी दिल्ली : जगभरातील इंटरनेट सेवा येत्या 48 तासांत ठप्प होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. इंटरनेटच्या मुख्य डोमेन सर्व्हरचे नियमित देखरेखीचे काम काही तासांसाठी सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे इंटरनेट सेवेवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

डोमेन सर्व्हरचे काम करण्यात येणार असल्याने इंटरनेट सेवा वापराबाबत अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. रशिया टूडेच्या वृत्तानुसार, या इंटरनेट सेवेच्या कामामुळे मुख्य डोमेन सर्व्हर आणि त्याच्याशी संबंधित नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर काही काळासाठी डाऊन होण्याची शक्यता आहे. 'इंटरनेट कॉर्पोरेशन ऑफ असाइन्ड नेम्स अँड नंबर्स' यादरम्यान इंटरनेट संदर्भातील क्रिप्टोग्राफिक की बदलून याच्या मेंटन्सचे काम केले जाणार आहे. त्यामुळे इंटरनेटचे अड्रेस बुक आणि डोमेन नेम सिस्टिम संरक्षित करण्यास मदत होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com