सुषमा स्वराज म्हणाल्या, घ्या केले ब्लॉक !

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 जुलै 2018

''मी पण तुमची चाहती होती. त्यामुळे याप्रकरणी तुमच्यावर अपशब्द वापरणाऱ्यांविरोधात मी लढले. त्यामुळे आता मला तुम्ही ब्लॉक करून बक्षिस द्या. त्याची मी वाट पाहिन''.

- सोनम महाजन, प्रसिद्ध ट्विटर युजर

नवी दिल्ली : लखनऊ पासपोर्टप्रकरण समोर आल्यानंतर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना टि्वटरवर ट्रोल केले जात आहे. याबाबत प्रसिद्ध ट्विटर युजर सोनम महाजन यांनीही त्यांच्यावर ट्विटवरून निशाणा साधला होता. सोनम महाजन यांनी केलेल्या ट्विटचा सुषमा स्वराज यांनी आज (मंगळवार) चांगलाच समाचार घेतला. त्यानंतर आज त्यांनी सुषमा स्वराज यांना ब्लॉक करण्यास ट्विटरवर सांगितले होते. त्यानंतर सुषमा स्वराज यांनी सोनम महाजन यांना टि्वटरवर ब्लॉक केले.

सोनम महाजन यांनी आज टि्वट केले होते. यामध्ये त्यांनी सांगितले, की ''हे चांगले प्रशासन द्यायला आले होते. हे घ्या 'अच्छे दिन' आले. हे ट्विट करताना त्यांनी सुषमा स्वराज यांना टॅग केले होते. त्यामध्ये त्यांनी सांगितले, की ''मी पण तुमची चाहती होती. त्यामुळे याप्रकरणी तुमच्यावर अपशब्द वापरणाऱ्यांविरोधात मी लढले. त्यामुळे आता मला तुम्ही ब्लॉक करून बक्षिस द्या. त्याची मी वाट पाहिन'', असे ट्विट सोनम महाजन यांनी केले होते. सोनम महाजन या प्रसिद्ध ट्विटर युजर असून, त्यांचे ट्विटरवर 2 लाख फॉलोवर्स आहेत.

सोनम महाजन यांच्या या ट्विटनंतर सुषमा स्वराज यांनीही त्यांना ब्लॉक करत ट्विट केले, की ''वाट कशाशी पाहता, घ्या ब्लॉक केले''. परराष्ट्रमंत्र्यांचे हे ट्विट काही क्षणांत व्हायरल झाले. या दोन तासांत स्वराज यांचे हे ट्विट तब्बल 2,300 जणांनी रिट्विट केले तर 6900 जणांनी त्याला लाईक केले.  

Web Title: intezaar kyon lijiye block kr diya sushma swaraj destroys trolls with this epic comeback