असहिष्णुता हा देशाला मिळालेला शाप: टाटा

वृत्तसंस्था
रविवार, 23 ऑक्टोबर 2016

ग्वाल्हेर - असहिष्णुता हा देशाला मिळालेला एक शाप असल्याची भावना जगप्रसिद्ध भारतीय उद्योगपती रतन टाटा यांनी व्यक्त केली आहे. 

ग्वाल्हेर - असहिष्णुता हा देशाला मिळालेला एक शाप असल्याची भावना जगप्रसिद्ध भारतीय उद्योगपती रतन टाटा यांनी व्यक्त केली आहे. 

"असहिष्णुता म्हणजे नेमके काय आहे; आणि याचा उगम कोठे आहे, या प्रश्‍नांची उत्तरे माझ्या मते प्रत्येकालाच माहिती आहेत. गेल्या काही काळापासून हा शाप पहावयास मिळतो आहे. देशातील लक्षावधी नागरिकांप्रमाणेच कोणालाही या देशात असहिष्णुता असू नये, असे वाटणे स्वाभाविक आहे,‘‘ असे टाटा म्हणाले. ग्वाल्हेरमधील "सिंदिया स्कूल‘च्या संस्थापनेच्या 119 व्या वर्षदिनानिमित्त टाटा हे बोलत होते. कॉंग्रेसचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी टाटा यांच्याआधी बोलताना देशात असहिष्णुता असल्याचे प्रतिपादन केले होते. टाटा यांनीही या भूमिकेस समर्थन दर्शविले. 

 ""आपल्या देशातील नागरिकांना एकमेकांवर प्रेम करता यावे, अशा वातावरणात रहावयाची आमची इच्छा आहे. देशातील नागरिकांना वेठीस न धरता परस्पर देवाणघेवाणीवर आधारित वातावरण असावयास हवे,‘‘ असे टाटा म्हणाले. 

Web Title: Intolerance is a curse we are seeing of late, says Ratan Tata