बेकायदा शस्त्रप्रकरणी माजी मंत्र्याची चौकशी करा : सर्वोच्च न्यायालय

बेकायदा शस्त्रप्रकरणी माजी मंत्र्याची चौकशी करा : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : मोठ्या प्रमाणात शस्त्र बाळगल्याप्रकरणी बिहारच्या माजी मंत्री मंजू वर्मा आणि त्यांचे पती चंद्रशेखर वर्मा यांची चौकशी करावी, असे निर्देश आज सर्वोच्च न्यायालयाने बिहार पोलिसांना दिले.

बिहारमधील मुझफ्फरपूर येथील बालगृहातील अत्याचारप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या मंजू वर्मा यांनी समाजकल्याणमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान चंद्रशेखर वर्मा आणि त्यांची पत्नी मंजू वर्मा यांच्या घरी बेकायदा शस्त्र जप्त केल्याचे सीबीआयने तपास अहवालात म्हटले आहे. या अहवालाचा संदर्भ घेत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले. याकामी स्थानिक पोलिस सहकार्य करतील अशी अपेक्षा न्यायधीश एम. बी. लोकूर आणि न्यायधीश दीपक गुप्ता यांच्या पीठाने व्यक्त केली.

तसेच बालगृहातील आठ मुलांना स्थलांतरित केल्याप्रकरणी बिहार सरकारने शपथपत्र सादर करावे, असेही निर्देश दिले. तपासाचा प्रगती अहवाल येत्या चार आठवड्यात सीलबंद पाकिटात सादर करावा, असे न्यायालयाने म्हटले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com