आयपीएस अधिकाऱ्याच्या भावासह 3 दहशतवाद्यांचा खात्मा

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 जानेवारी 2019

श्रीनगर : काश्मीरच्या शोपियाँ येथे भारतीय लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत आयपीएस अधिकाऱ्याच्या भावासह अन्य 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. ही चकमक आज (मंगळवार) झाली. 

शमसूल मेंगनू असे या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. शमसूल हा भारतीय पोलिस सेवेमध्ये (आयपीएस) कार्यरत असलेल्या इनामूल हक मेंगनू यांचा धाकटा भाऊ असल्याची माहिती मिळत आहे. शमसूलने उराणी वैद्यकीय विभागात  पदवीचे शिक्षण घेतले होते. आज झालेल्या या चकमकीत त्याच्यासह अन्य 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या परिसरातून दहशतवाद्यांकडून तीन शस्त्रात्रे आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. तसेच या चकमकीत जखमी झालेल्या जवानांना वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

दरम्यान, जम्मू आणि काश्मीरचे राष्ट्रीय रायफल्स आणि स्पेशल ऑपरेशन ग्रुपच्या जवानांनी या परिसरात दहशवाद्यांविरोधात मोहीम राबविली आहे.  
 
Web Title: IPS Officers Brother Among 3 Militants Killed in Encounter in Kashmirs Shopian District