मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी रश्मी शुक्ला?

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी महिला आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच आयपीएस परमवीर सिंह यांचेही नाव या पदासाठी चर्चेत आहे.

मुंबई : मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी महिला आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच आयपीएस परमवीर सिंह यांचेही नाव या पदासाठी चर्चेत आहे.

रश्मी शुक्ला यांनी पोलिस दलात विविध पदे सांभाळली आहेत. 2016 मध्ये पुण्याच्या पोलिस आयुक्तपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती. त्यावेळी पुण्याच्या दुसऱ्या महिला पोलिस आयुक्त त्या ठरल्या होत्या. सध्या त्या राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त आहेत. आता त्यांचे नाव मुंबईच्या आयुक्तपदासाठी चर्चेत आहे. 

दरम्यान, आत्तापर्यंत मुंबईत महिला अधिकाऱ्याची पोलिस आयुक्तपदी नेमणूक झाली नव्हती. मात्र, आता त्यांची निवड झाल्यास त्यांच्या रुपाने इतिहासात पहिलीच महिला आयुक्त मुंबई शहरासाठी लाभणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: IPS Rashmi Shukla may be CP of Mumbai City