इराणकडून 15 भारतीय मच्छिमार मुक्त

वृत्तसंस्था
सोमवार, 3 एप्रिल 2017

भारतामध्ये अटक करण्यात आलेल्या इराणी वंशाच्या एका ब्रिटीश नागरिकास मुक्‍त करण्यात आल्यानंतर एका आठवड्याच्या आतच भारतीय मच्छिमारांचीही मुक्‍तता करण्यात आली आहे

नवी दिल्ली - इराणकडून अटक करण्यात आलेल्या 15 भारतीय मच्छिमारांना मुक्‍त करण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आज (सोमवार) एका ट्विटद्वारे दिली.

या मच्छिमारांना गेल्या 22 ऑक्‍टोबर रोजी इराणकडून अटक करण्यात आली होती. हे मच्छिमार बहारीन येथून शारजा येथे जात असताना इराणने त्यांना ताब्यात घेतले होते. भारतामध्ये अटक करण्यात आलेल्या इराणी वंशाच्या एका ब्रिटीश नागरिकास मुक्‍त करण्यात आल्यानंतर एका आठवड्याच्या आतच भारतीय मच्छिमारांचीही मुक्‍तता करण्यात आली आहे. इराणच्या ताब्यात अद्यापी 22 भारतीय मच्छिमार आहेत. या मच्छिमारांना ऑगस्ट 2016 ते जानेवारी 2017 या काळात अटक करण्यात आली होती.

या मच्छिमारांची झालेली मुक्तता हे भारत व इराणमधील सौहार्दपूर्ण संबंधांचे चिन्ह मानले जात आहे.

Web Title: Iran releases 15 Indian fishermen