IRCTC Rules : ट्रेन चुकली, लेट झाली तर घाबरून जाऊ नका; रेल्वेकडून मोफत मिळतील सगळ्या सुविधा | IRCTC rules What if your train got late or train missed | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IRCTC Train rules
IRCTC Rules : ट्रेन चुकली, लेट झाली तर घाबरून जाऊ नका; रेल्वेकडून मोफत मिळतील सगळ्या सुविधा

IRCTC Rules : ट्रेन चुकली, लेट झाली तर घाबरून जाऊ नका; रेल्वेकडून मोफत मिळतील सगळ्या सुविधा

कोट्यवधी लोक दररोज रेल्वेने प्रवास करतात, परंतु अनेकदा ट्रेन लेट झाल्याने लोकांची गैरसोय होते. प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी भारतीय रेल्वे वेळोवेळी नियमांमध्ये बदल करत असते. ट्रेन लेट असतानाही भारतीय रेल्वे प्रवाशांना अनेक सुविधा पुरवते. त्या सुविधा काय आहेत ते जाणून घेऊया.

मोफत जेवण

IRCTC च्या नियमांनुसार, ट्रेनला दोन तास किंवा त्यापेक्षा जास्त उशीर झाल्यास, कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांना मोफत जेवणाची सुविधा दिली जाते. प्रवाशांना नियमानुसार दुपारचे आणि रात्रीचे जेवण दिले जाते. ही सुविधा फक्त शताब्दी, राजधानी आणि दुरांतो ट्रेनमध्ये उपलब्ध आहे. नियमांनुसार, ट्रेन लेट असताना तुम्हाला मिळणाऱ्या जेवणासाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत.

पैसे परत

ट्रेन तीन तासांपेक्षा जास्त उशीर झाल्यास, तुम्ही तिकीट रद्द करू शकता आणि पूर्ण परतावा मिळवू शकता. रेल्वे काउंटरवर ऑफलाईन तिकीट बूक करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सुविधा उपलब्ध असून, ही सुविधा ऑनलाइनही उपलब्ध होणार आहे. तिकीट रद्द करण्याव्यतिरिक्त, प्रवासी विविध कारणांमुळे ट्रेन चुकले तरीही पूर्ण परतावा मिळण्याचा अधिकार आहे. यासाठी तुम्हाला ट्रेन सुटल्यानंतर एक तासाच्या आत टीडीआर फॉर्म भरावा लागेल. ही सुविधा ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारांसाठी उपलब्ध आहे.

राहण्याची सोय

जर ट्रेन उशिराने धावत असेल तर IRCTC भारतीय रेल्वेच्या विविध रेल्वे स्थानकांवर वेटिंग रूममध्ये मोफत राहण्याची व्यवस्था देखील करते. वेटिंग रूम सुविधेचा लाभ घेणार्‍या सर्व प्रवाशांनी त्यांचे रेल्वे तिकीट देखील दाखवणे आवश्यक आहे. प्रत्येक स्टेशनवर स्वतंत्र वेटिंग रूम आहेत.

लॉकर रुम

ट्रेन लेट असताना जेवणाशिवाय अनेक प्रकारच्या सुविधा मोफत उपलब्ध आहेत. सुरक्षित लॉकर रूम प्रमाणे जिथे तुम्ही तुमचे सामान लॉक करू शकता. याशिवाय व्हील चेअर, प्रथमोपचार आणि वैद्यकीय सेवा अशा सुविधाही प्रवाशांना मोफत दिल्या जातात.