'अश्लील जाहिराती नको असतील तर हिस्ट्री डिलिट करा'

वृत्तसंस्था
गुरुवार, 30 मे 2019

आयआरसीटीसीच्या या उत्तरानंतर आनंद कुमारलाच नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरूवात केल्यामुळे तो चर्चेत आला आहे.

नवी दिल्लीः 'आयआरसीटीसीच्या तिकिट बुकिंग ऍपवर वारंवार अश्लील जाहिराती समोर येत असतात, हे खूप लाजिरवाणं आणि त्रासदायकही आहे’, अशी तक्रार आनंद कुमार नावाच्या एका ट्विटर युजरने केली. अश्लील जाहिराती नको असतील तर तुमच्या इंटरनेट ब्राउजरमधील सर्व कुकिज आणि हिस्ट्री आधी डिलिट करा’, असं उत्तर आयआरसीटीसीने दिले आहे.

आनंद कुमारने रेल्वेला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. पण त्यावर भारतीय रेल्वेकडून आलेल्या उत्तराने त्याची स्वतःचीच पोलखोल झाली. यामुळे भारतीय रेल्वेचे अधिकृत तिकिट बुकिंग संकेतस्थळ चर्चेत आले आहे.

आनंद कुमारने अश्लील जाहिरातींविषयी ट्विट केले. शिवाय, ते ट्विट आयआरसीटीसी, रेल्वेमंत्री पीयुष गोयल आणि रेल्वे मंत्रालयाच्या अकाऊंटचा टॅग केले. अश्लील जाहिराती वारंवार आयआरसीटीसीच्या तिकीट आरक्षणाच्या अॅपवर येत आहेत. हे अतिशय लाजिरवाणं आणि त्रासदायक आहे', असे आनंद कुमारने ट्विटमध्ये लिहिले होते.

तक्रार स्वरुपात करण्यात आलेल्या या ट्विटला उत्तर देत @RailwaySeva या ट्विटर अकाऊंटवरुन आनंद कुमारची थेट शब्दात कानउघाडणी करताना म्हटले आहे की, 'आयआरसीटीची गुगलच्या अॅड सर्व्हिंग टूलच्या सहाय्याने गुगल जाहिरातींचा वापर करते. ज्यामध्ये युजरचे लक्ष वेधले जाते. या जाहिराती युजरच्या मोबाईलची हिस्ट्री आणि ब्राऊझिंग डेटा वापरुन दाखवण्यात येतात. त्यामुळे तुमच्या अशा जाहिराती टाळण्यासाठी तुमच्या मोबाईलची हिस्ट्री आणि ब्राऊझिंग डेटा क्लिअर करा.' अशी थेट शब्दांतील कानउघडणी करण्यात आली.

दरम्यान, रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आलेल्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. नेटिझन्सनी या ट्विटवर प्रतिक्रिया व्यक्त करण्याबरोबरच व्हायरल केले आहे. आयआरसीटीसीच्या या उत्तरानंतर आनंद कुमारलाच नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरूवात केल्यामुळे तो चर्चेत आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: irctc trending on internet as it gives an epic reply to users tweet on obscene and vulgar ads