Video : जमशेदपूरमधील टाटा स्टील प्लांटमध्ये स्फोटानंतर भीषण आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video : जमशेदपूरमधील टाटा स्टील प्लांटमध्ये स्फोटानंतर भीषण आग

Video : जमशेदपूरमधील टाटा स्टील प्लांटमध्ये स्फोटानंतर भीषण आग

जमशेदपूर : झारखंडमधील जमशेदपूर येथील टाटा स्टीलच्या (Tata Still) कोक प्लांटमध्ये शनिवारी मोठी दुर्घटना घडली. प्लांटमध्ये प्रथम स्फोट झाला, त्यानंतर काही क्षणात प्लांटमध्ये भीषण आग लागली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी 5 गाड्या रवाना झाल्या आहेत. प्लांटमध्ये गॅस कटिंग आणि वेल्डिंग दरम्यान गॅस गळतीमुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही या घटनेबाबत ट्विट केले आहे. दरम्यान, घटनेनंतर टाटा स्टीलकडून एक निवेदन जारी करण्यात आले असून, यामध्ये परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले आहे. (Massive Fire Broke Out In Tata Jamshedpur Plant )

मिळालेल्या माहितीनुसार, स्फोट इतका भीषण होता की त्याचा आवाज दूरदूरपर्यंत ऐकू आला. स्फोटाचा आवाज ऐकून लोकांमध्ये घबराट पसरली. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. तसेच अन्य दोन जण जखमी झाले आहेत. कोक प्लांटच्या पाच, सहा आणि सात क्रमांकाच्या बॅटरीमध्ये हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा: ब्रेकिंग : NEET PG 2022 परीक्षा नियोजित वेळतच होणार

कशी घडली घटना

जमशेदपूर येथील पाच, सहा, सात क्रमांकाच्या बॅटरीच्या गॅस लाईनमध्ये गॅस कटिंग आणि वेल्डिंगचे काम सुरू होते. त्यावेळी पाइपलाइनमधून गॅस गळती सुरू झाली. गॅस लाइनमध्ये कोक ओव्हन गॅस होता. त्यावेळी अचानक स्फोट झाला आणि आग लागली आणि पाहता पाहता आगीने भीषण रूप धारण केले.

टाटा स्टीलकडून निवेदन

दरम्यान घटनेनंतर, टाटा स्टीलने एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये शनिवारी सकाळी १०.२० च्या सुमारास कोक प्लांटच्या बॅटरी क्रमांक 6 च्या गॅस लाइनमध्ये स्फोट झाला. त्यानंतर काही वेळातच आग लागली. सध्या बॅटरी क्रमांक 6 बंद ठेवण्यात आले असून, संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला आहे. तसेच परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले आहे.

Web Title: Ire Broke Out In A Coke Plant Of Tata Steel Factory In Jamshedpur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Tata Group
go to top