इरोम शर्मिला यांच्या नव्या पक्षाची स्थापना

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 ऑक्टोबर 2016

मणिपूरमधील मानवधिकार कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी "पीपल्स रिसर्जन्स जस्टिस अलियन्स' या नव्या पक्षाची स्थापना केली.

इंफाळ- मणिपूरमधील मानवधिकार कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी "पीपल्स रिसर्जन्स जस्टिस अलियन्स' या नव्या पक्षाची स्थापना केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून राजकीय सल्ला घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सशस्त्र दल विशेषाधिकार कायद्याविरोधात लढा देण्यासाठी इरोम शर्मिला यांनी गेली 16 वर्षे उपोषण केले होते. दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी उपोषण सोडले. त्या वेळी राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत त्यांनी दिले होते. तसेच आपल्या मागण्या पूर्ण होण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर विराजमान होण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली होती. मणिपूरमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यात पूर्ण ताकदीने उतरण्यासाठी त्यांनी नव्या पक्षाची घोषणा आज इंफाळमध्ये केली. गेल्या महिन्यात शर्मिला यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. मणिपूरमधील प्रमुख राजकीय पक्षांना धूळ कशी चारायची, याविषयी त्यांचे मार्गदर्शनही घेतले होते.

Web Title: Irom Sharmila launches new party, to contest Manipur assembly