इसिसचे 15 दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत?

वृत्तसंस्था
रविवार, 26 मे 2019

'इस्लामिक स्टेट' (आयएस) या दहशतवादी संघटनेचे 15 दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली.

तिरुअनंतपुरम : 'इस्लामिक स्टेट' (आयएस) या दहशतवादी संघटनेचे 15 दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. हे सर्व दहशतवादी श्रीलंकेहून लक्षद्वीपकडे नौकेच्या माध्यमातून येत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता या भागात हायअॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

या भागात संशयास्पद नौका आढळल्यास याबाबतची माहिती देण्यात यावी, असेही सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर तटरक्षक दलाच्या चौक्या आणि जिल्हा पोलिस प्रमुखांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हा संपूर्ण भाग 23 मेपासून हायअॅलर्टवर असल्याचेही तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

दरम्यान, श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आम्ही सतर्क आहोत. मच्छिमार नौका आणि समुद्रात जाणाऱ्या लोकांना संशयास्पद नौकेबाबत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत, असेही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ISIS 15 Terrorists May ready to enter in India