दिल्ली, उत्तर प्रदेशमध्ये दहशतवादी संघटनेवर छापे

वृत्तसंस्था
बुधवार, 26 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : कट्टर दहशतवादी संघटना 'इसिस'शी संबंधित असलेली एक संघटना दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये सक्रिय झाल्याची गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. या गोपनीय माहितीच्या आधारे राष्ट्रीय तपास यंत्रणेने आज (बुधवार) एकूण 16 ठिकाणी छापे घातले. 

'हरकत उल हर्ब ए इस्लाम' असे त्या संघटनेचे नाव आहे. ही संघटना 'इसिस'च्या दहशतवादी कृत्यांशी निगडीत असल्याची माहिती यंत्रणांना मिळाली. त्या आधारे आज पहाटेपासून सुरक्षा यंत्रणांनी दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये छापासत्र सुरू केले. 

प्राथमिक माहितीनुसार, आतापर्यंत किमान 10 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई प्रामुख्याने पूर्व दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या पश्‍चिम भागात झाली. 

Web Title: ISIS linked terror group in Delhi, NIA raids