सेक्स करताना गुदमरून मृत्यू ; प्रियकराविरूद्ध गुन्हा दाखल

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 जुलै 2018

''हे दोघेही इस्त्रायल देशाचे नागरिक असून, ते भारत भेटीसाठी प्रवासी व्हिसावर आले होते. त्यावेळी त्यांनी कुलाबा येथील हॉटेलमधील एका रुममध्ये सेक्स केला. यादरम्यान याकोवने तिच्या प्रेयसीच्या नाकावर जोर दिला. यामध्ये गुदमरून तिचा मृत्यू झाला'', अशी माहिती पोलिसांनी दिली. 

मुंबई : एका 20 वर्षीय तरुणीचा सेक्सदरम्यान मागील वर्षी गुदमरून मृत्यू झाला. याप्रकरणाचा फॉरेन्सिक अहवाल आज (मंगळवार) आल्यानंतर याबाबतची माहिती समोर आली.  इस्त्रायलचा रहिवासी असलेल्या एका 23 वर्षीय व्यक्तीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ऑरिरॉन याकोव असे असे त्या व्यक्तीचे नाव असून, त्याच्याविरोधात भारतीय दंडविधानअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑरिरॉन याकोव हा मूळचा इस्त्रायल देशाचा नागरिक असून, त्याची 20 वर्षीय प्रेयसीदेखील इस्त्रायल देशाची नागरिक आहे. याकोव आणि त्याची प्रेयसी हे दोघेही प्रवासी व्हिसावर भारत भेटीसाठी आले होते. त्यावेळी दक्षिण मुंबईतील कोलाबा येथील एका हॉटेलमध्ये ते राहिले होते. या दोघांनी हॉटेलमध्ये तेव्हा सेक्स केला होता. मात्र, यादरम्यान प्रेयसीचा मृत्यू झाला होता. हा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची माहिती मिळाली नाही. मात्र, आता या मृत्यूचा फॉरेन्सिक अहवाल मिळाल्यानंतर हा मृत्यू सेक्सदरम्यान गुदमरून झाल्याची बाब समोर आली. ही घटना मागील वर्षी मार्चमध्ये घडली.

''हे दोघेही इस्त्रायल देशाचे नागरिक असून, ते भारत भेटीसाठी प्रवासी व्हिसावर आले होते. त्यावेळी त्यांनी कुलाबा येथील हॉटेलमधील एका रुममध्ये सेक्स केला. यादरम्यान याकोवने तिच्या प्रेयसीच्या नाकावर जोर दिला. यामध्ये गुदमरून तिचा मृत्यू झाला'', अशी माहिती पोलिसांनी दिली. 

तसेच या घटनेनंतर प्रेयसी कोणतीही हालचाल करत नसल्याने याकोवने याबाबतची माहिती हॉटेलच्या स्टाफला दिली. त्यानंतर त्या तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबतची माहिती मिळाली नसल्याने या मृत्यूची नोंद अपघाती मृत्यू म्हणून करण्यात आली होती. मात्र, जेव्हा फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर याकोवच्या प्रेयसीचा मृत्यू गुदरमरून झाल्याचे समोर आले. हा अहवाल आल्यानंतर सध्या इस्त्रायलमध्ये राहणाऱ्या याकोवविरोधात गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.  

Web Title: Israeli man booked year after girlfriend dies of suffocation during sex in Mumbai hotel