जीसॅट-7ए चं यशस्वी प्रक्षेपण; हवाई दलाची ताकद वाढणार

वृत्तसंस्था
बुधवार, 19 डिसेंबर 2018

नवी दिल्ली-  भारतीय अवकाश संशोधन केंद्रानं (ISRO) आज जीएसएलव्ही-एफ 11/जीसॅट -7ए या दळणवळण उपग्रहाचं प्रक्षेपण केलं. प्रक्षेपणानंतर या उपग्रहानं आज 4 वाजून 10 मिनिटांनी यशस्वीरित्या अंतराळात प्रवेश केला. या उपग्रहामुळं हवाई दलाची ताकद आणखी वाढणार आहे. जीसॅट-7 ए हा लष्कराचा 39 वा दळणवळण उपग्रह आहे.

या उपग्रहासाठी 500 ते 800 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत, असं सांगण्यात येत आहे. त्यात चार सोलर पॅनल बसवण्यात आले आहेत. त्यातून जवळपास 3.3 किलोवॉट विजेची निर्मिती केली जाऊ शकते. जीसॅट -7ए आधी इस्रोनं जीसॅट 7 (रुक्मिणी) हा उपग्रह प्रक्षेपित केला होता. 29 डिसेंबर 2013 रोजी त्याचं प्रक्षेपण केलं होतं. भारतीय नौदलासाठीच खास त्याची निर्मिती केली होती. या उपग्रहाचा वापर लढाऊ विमानं, पाणबुड्या वाहून नेण्यासाठी केला जातो. आगामी काही वर्षांत भारतीय हवाई दलाला जीसॅट 7 सी उपग्रहही मिळू शकतो. त्यामुळं नौदलाची ताकद आणखीनच वाढेल, असं सांगण्यात येत आहे. 

हवाई दलाचे तळ जोडण्या इतकेच जीसॅट-7 ए चे कार्य मर्यादीत नाही तर हवाई दलाच्या ड्रोन मोहिमांमध्येही मोठा फायदा होणार आहे. सध्याचे हवाई दलाचे जमिनीवरील जे नियंत्रण कक्ष आहेत ते उपग्रह केंद्रीत नियंत्रण कक्षामध्ये बदलले जातील. जीसॅट-7 ए मुळे मानवरहित ड्रोन विमानांचा पल्ला, टिकण्याची क्षमता आणि लवचिकता मोठया प्रमाणात वाढणार आहे. भारताची अमेरिकेकडून प्रीडेटर-बी आणि सी गार्डीयन ड्रोन खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु असताना जीसॅट-7 ए उपग्रहाचे प्रक्षेपण होत आहे. प्रीडेटर-बी आणि सी गार्डीयन ड्रोन ही उंचावरुन आणि दिर्घकाळ उड्डाण करण्याची क्षमता असलेली उपग्रह नियंत्रित मानवरहित ड्रोन विमाने आहेत.

Web Title: ISRO to launch GSAT-7A satellite from Sriharikota today