नव्या मोहिमेसाठी इस्रो सज्ज

वृत्तसंस्था
शनिवार, 29 एप्रिल 2017

चेन्नई: श्रीहरिकोटा येथून पाच मे रोजी आकाशाकडे झेपावणाऱ्या जीएसएलव्ही मोहिमेच्या प्रक्षेपणासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो सज्ज झाली आहे. या वेळी जीएसएलव्ही-एफ09 दूरसंचार उपग्रह जीएसएटी-9 अवकाशात नेणार असून, त्याचे उड्डाण दुसऱ्या लॉंच पॅडवरून होणार आहे.

इस्रो येत्या दोन दिवसांत जीएसएलव्ही मोहिमेच्या उड्डाणाची वेळ घोषित करेल अशी आशा आहे. जीएसएलव्ही-एफ05च्या यशानंतर तब्बल आठ महिन्यांनी जीएसएलव्हीद्वारे होणारे ही मोहीम असल्याने हिला विशेष महत्त्व आहे. यापूर्वीच्या मोहिमेत उपग्रहाचे वजन हे दोन हजार दोनशे अकरा किलोग्राम होते, तर आत्ताच्या मोहिमेत दोन हजार दोनशे तीस इतक्‍या वजनाचे उपग्रह असतील, अशी माहिती देण्यात आली आहे. यंदाचे उड्डाण हे जीएसएलव्ही यानाची 11वी मोहीम असणार आहे.

शुक्राच्या अभ्यासासाठी मागविले प्रस्ताव
शुक्र आणि पृथ्वी यांच्यामधील साम्य आणि या दोन्हींचे मूळ एकच असल्याचा विश्‍वास यामुळे शुक्र ग्रहाबद्दल कायमच उत्सुकता राहिली आहे. भारतात या ग्रहाच्या अभ्यासासाठी इच्छुक शास्त्रज्ञांनी आपली नावे संस्थेला कळवावीत, असे सांगत इस्रोने संधीची घोषणा केली आहे. यासाठीचे प्रस्ताव देण्यासाठी 19 मे ही शेवटची तारीख असणार आहे.

Web Title: ISRO ready for new campaign