इस्त्रोच्या ऐतिहासिक यशाला देशभरातून सलाम

वृत्तसंस्था
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

श्रीहरिकोटा येथून एकाच प्रक्षेपकातून तब्बल 104 उपग्रह पाठविण्याचा विश्‍वविक्रम आज (बुधवार) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) केला.

नवी दिल्ली - इस्त्रोने 104 उपग्रहांचे यशस्वीरित्या प्रक्षेपण केल्याने ही भारतीय शास्त्रज्ञांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. मी सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही इस्त्रोच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. देशाला इस्त्रोच्या कामगिरीचा गर्व आहे. भारत अंतराळ क्षेत्रात आपली क्षमता वाढवत असल्याचे, मुखर्जी यांनी म्हटले आहे.

श्रीहरिकोटा येथून एकाच प्रक्षेपकातून तब्बल 104 उपग्रह पाठविण्याचा विश्‍वविक्रम आज (बुधवार) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) केला. एकाच प्रक्षेपकाद्वारे एवढे उपग्रह पाठविणारा भारत हा पहिलाच देश असून ही एक ऐतिहासिक घटना आहे. आज (बुधवार) सकाळी 9 वाजून 28 मिनिटांनी इस्त्रोने ही ऐतिहासिक कामगिरी केली. पीएसएलव्ही-सी37/कॅट्रोसॅट2 श्रेणीतील हा उपग्रह अवकाशात यशस्वीरित्या झेपावला. पीएसएलव्ही-सी37चे हे 39 वे उड्डाण असून या वेळी त्याने 104 उपग्रह नेले. आंतरराष्ट्रीय ग्राहकांच्या उपग्रहांचाही यामध्ये समावेश आहे.

इस्त्रोच्या टीमला माझा सलाम. त्यांनी केलेली कामगिरी भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. 104 उपग्रह इस्त्रोने यशस्वीरित्या प्रक्षेपण केलेल्या क्षणाचा मी साक्षीदार होतो.
- चंद्रबाबू नायडू, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री

पुन्हा एकदा उंच भरारी. एकाच प्रयत्नात 104 उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करण्याची ही कामगिरी विक्रमी आहे. आपल्यासाठी गर्वाचा क्षण आहे.
- सुरेश प्रभू, रेल्वेमंत्री

इस्त्रोच्या टीमला सलाम. 104 उपग्रह एकाचवेळी अवकाशात सोडून इस्त्रोने ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
- व्यंकय्या नायडू, केंद्रीय मंत्री

इस्त्रोच्या टीमचे अभिनंदन.
- डॉ. जितेंद्र सिंह, केंद्रीय मंत्री

भारतीय असल्याचा अभिमान वाटतो.
- अमिताभ बच्चन, अभिनेते

100 हून अधिक उपग्रहांचे एकाचवेळी प्रक्षेपण करून इस्त्रोने ऐतिहासिक यश मिळविले आहे. भारताला या सर्व शास्त्रज्ञांचा अभिमान आहे.
- रणदीप सुरजेवाला, काँग्रेस नेते

Web Title: isro for the successful launch of PSLV-C37 and CARTOSAT satellite together with 103 nano satellites