'आयआरएनएसएस-1आय' उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 एप्रिल 2018

इस्त्रोकडून आज पहाटे चार वाजून चार मिनिटांनी हा उपग्रह अवकाशात सोडण्यात आला. हा 1425 किलोग्रॅमचा उपग्रह पीएसएलव्ही-सी41 या प्रक्षेपकाद्वारे अवकाशात सोडण्यात आला. श्रीहरिकोटा येथून सोडण्यात येणार असणाऱ्या या उपग्रहाचे आयुष्यमान दहा वर्षांचे आहे. 

चेन्नई : भारताचा दूरसंवेदन उपग्रह 'आयआरएनएसएस-1आय' या उपग्रहाचे आज (गुरुवार) पहाटे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.

इस्त्रोकडून आज पहाटे चार वाजून चार मिनिटांनी हा उपग्रह अवकाशात सोडण्यात आला. हा 1425 किलोग्रॅमचा उपग्रह पीएसएलव्ही-सी41 या प्रक्षेपकाद्वारे अवकाशात सोडण्यात आला. श्रीहरिकोटा येथून सोडण्यात येणार असणाऱ्या या उपग्रहाचे आयुष्यमान दहा वर्षांचे आहे. 

दिशादर्शक उपग्रहांच्या मालिकेतील हा नववा उपग्रह आहे. 'आयआरएनएसएस-1ए' या उपग्रहाची जागा नवा उपग्रह घेईल. 'आयआरएनएसएस-1ए' उपग्रहातील आण्विक घड्याळ बिघडले आहे. इस्त्रोचे प्रमुख के. सिवान यांनी या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे. 

Web Title: ISRO Successfully Launches Navigation Satellite INRSS-1I