जुने बेळगाव येथील कचरा प्रकल्पावरून अधिकारी धारेवर

जुने बेळगाव येथील कचरा प्रकल्पावरून अधिकारी धारेवर

बेळगाव - नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने जुने बेळगाव येथील वैद्यकीय कचरा प्रकल्प बंद करण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.  महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कर्मचाऱ्यांना बुधवारी या प्रश्नी नागरिकांनी धारेवर धरत जाब विचारला.

तसेच कोणत्याही परिस्थितीत प्रकल्प सुरू करू देणार नाही असा इशारा दिला. त्यामुळे दोन दिवसात कचरा प्रकल्प बंद करण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल. असे आश्वासन महापालिकेचे आरोग्यधिकारी शशिधर नाडगौडा व परिसर प्रदूषण नियंत्रणाधिकारी गोपालकृष्ण यांनी दिले आहे. मात्र प्रकल्प सुरू झाल्यास निर्माण होणाऱ्या परिस्थितीला प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही देण्यात आला आहे.

बुधवारी महापालिका अधिकारी व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी नागरिकांनी प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविला.

जुने बेळगाव येथे 2000 पासून वैद्यकीय कचरा जाळण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. प्रकल्प सुरू झाल्यापासून परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रकल्पाला तीव्र विरोध करण्यात येत आहे. तरीही  प्रकल्प सुरूच ठेवण्यात आला आहे. दिवसाला 400 किलो पेक्षा अधिक प्रमाणात कचरा जाळण्यात येत असून प्रदूषणात वाढ होत आहे. त्यामुळे प्रकल्प सुरू करण्यास विरोध वाढला आहे काही दिवसांपूर्वी उपमहापौर मधुश्री पुजारी यांनी प्रकल्पाची पहाणी करून कचरा जाळू नका अशा सूचना करीत प्रकल्पाला कुलूप लावले होते. मात्र कुलूप तोडून पुन्हा प्रकल्प सुरू करण्यात आल्यामुळे नागरिकांनी यापुढे प्रकल्प सुरू ठेवण्यास विरोध दर्शविला आहे.

पाहणीवेळी माजी महापौर आप्पासाहेब पुजारी, नितीन खन्नूकर, संतोष शिवणगेकर, नारायण बेनके , रमेश सुनगार, मोहन बेनके, अमर बाळेकुंद्री, ज्योतिबा भोसले, रेश्मा भरमुचे, मंगल कंणबरकर, कल्पना भोसले, लक्ष्मी भरमुचे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com