थकित बिलासह दर घोषणेसाठी हाल शुगरचा ऊस रोखला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 डिसेंबर 2018

निपाणी - गेल्या वर्षीच्या गळीत हंगामातील उसाचे थकीत बिल देण्यासह यंदाच्या हंगामातील उसाचा दर जाहीर करावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी( ता. २४) हालसिद्धनाथ साखर कारखान्याची ऊस वाहतूक रोखली. 

वाहने व बैलगाड्या रोखून आंदोलन करण्यात आले. यावेळी मंडल पोलीस निरीक्षक संतोष सत्यनायक यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळी साडेअकराच्या सुमारास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक करणारी सर्व वाहने रोखली व सेवा रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले. 

कार्यकर्त्यांनी ऊस आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, उसाला योग्य दर दिलाच पाहिजे, गतवर्षीची थकीत बिले मिळालीच पाहिजेत अशा घोषणा देऊन महामार्ग दणाणून सोडला होता. सौंदलगा, यमगर्णी, कुर्ली, आप्पाचीवाडी परिसरातील ऊस भरून आलेल्या बैलगाड्या सेवा रस्त्यावर रोखून धरल्या. यावेळी काही बैलगाडी मालकांनी ऊस भरलेल्या गाड्या पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी बैलगाड्यांच्या चाकातील हवा काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पुढे जाणाऱ्या सर्वच गाड्या रोखून धरल्या. यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडी मालकांची मोठी गैरसोय झाली. बैलगाडीच्या मालकांनी बैलांच्या दोर्‍या सोडून त्यांना सावलीमध्ये पाणी आणि चारा देण्याचा प्रयत्न केला. 

दुपारी एकवाजेपर्यंत साखर कारखान्याचे संचालक व अन्य पदाधिकारी आंदोलनस्थळी आले नव्हते. तरीही आंदोलनकर्ते आपल्या मागण्या वर ठाम होते.

आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रा. एन. आय.खोत, सुभाष चौगुले, रमेश पाटील, श्रीकांत संकपाळ, प्रा.मधुकर पाटील आदी सहभागी झाले होते. 

Web Title: issue of sugarcane rate agitation in Nipani