पर्रीकर आणि मला बदनाम करण्याचा काँग्रेसचा कट : राणे

rane
rane

पणजी : काँग्रेसने राष्ट्रीय पातळीवर मला बदनाम करण्यासाठी कट रचला आहे. राफेल प्रकरणासंदर्भात मी कोणाकडेच कोणत्याही प्रकारची टिप्पणी केलेली नसून काँग्रेसचे राष्ट्रीप प्रवक्‍ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी केलेला आरोप खोटा आहे. सुरजेवाला यांनी दिल्लीत पत्रकारपरिषदेत सादर केलेल्या ऑडिओ क्‍लिपमधधील आवाजाची तपासणी व्हावी, असे पत्र मी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना लिहले असून भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याशीही यासंदर्भात बातचीत केली आहे, असे स्पष्टीकरण गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आज दुपारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.

राफेलसंदर्भातील सर्व माहिती आणि फाईल्स माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे असल्याची माहिती अनामिकाला देतानाचे फोनवरील संभाषण सुरजेवाला यांनी पत्रकारांना ऐकवले आणि राफेलप्रकरणाची माहिती मुख्यमंत्री पर्रीकरांना असल्याचा आरोप केला. या आरोपाचे खंडण करीत मंत्री राणे यांनी या प्रकरणाची तपासणी लवकरात लवकर व्हावी, अशी मागणी अमित शहांकडे केली आहे.

मी भाजपाचा मंत्री असून येथूनपुढेही मी भाजप पक्षाशीच बांधील राहणार असल्याचे सांगत माझा आणि या क्‍लिपचा काहीही संबंध नसल्याचे मंत्री राणे म्हणाले. काँग्रेसचे नेते ए. चेल्लाकुमार यांच्या संपर्कात असल्याचा खोटा आरोप माझ्यावर होत असून हे आरोप केवळ मला आणि मुख्यमंत्री पर्रीकरांना बदनाम करण्यासाठी केले जात आहेत. विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसकडे बोलायला मुद्‌दे नसल्याने ते खोटी माहिती पसरवून लोकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप राणे यांनी केला. 

यासंदर्भात मी कोणतीही तक्रार नोंद केलेली नसून मुख्यमंत्र्यांना दिलेल्या लेखी पत्राच्या आधारावर तेच पुढील कारवाई करणार असल्याचे मंत्री राणे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com