Coronavirus :काय कोरौनाचा, आमच्यापासून दूर हो

Coronavirus :काय कोरौनाचा, आमच्यापासून दूर हो

लखनौ - काय कोणत्या गावचा, कोरौना, हे ऐकल्यावर कोणी काही बोलतच नाही. जणू आमच्यापासून दूर व्हा, आम्हाला फोनही करु नका, अशीच भावना आहे. कोरोनामुळे गेल्या तीन महिन्यापासून एका छोट्या गावातील गावकऱ्यांचे जगणे कठिण झाले आहे. कोरोनाने गावात प्रवेश केला नसला तरी केवळ त्याच्या नावाने या गावाला त्रास दिला आहे. 

सीतापूर जिल्ह्यातील कोरौना गाव काही नवीन नाही. उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध 84-कोसी परिक्रमेच्या मार्गावरील हा पहिला थांबा आहे. ही परीक्रमा केल्यावर 84 लक्ष्य योनीतून मुक्ती मिळते अशी आख्यायिका आहे आणि त्याच गावाला आता त्याच्या नावामुळेच त्रास होत आहे.  कोरोनाची साथ संपली तरी आपल्या यातना संपणार नाहीत, अशीच कोरौना येथील गावकऱ्यांची खंत आहे. 

आमच्या गावाचे नाव ऐकले की दुय्यमच समजले जाते. अनेकदा अपमान होतो. देशभरात लॉकडाऊन असल्यामुळे या गावातही रस्ते एकाकी होतात, पण त्याहीपेक्षा या रस्त्याशेजारील घरात जास्त धास्ती, दुःख आणि त्यापेक्षाही चीड जाणवते. आम्ही गावाचे नाव कोरोना सांगितले की आम्हालाच कोरोना झाल्याचे वाटू लागते. काही जण तर तुम्ही अजून ठीक कसे, जीवंत कसे असे विचारतात, आणि मस्करी केली असे सांगत हसायला सुरुवात करतात. 

लखनौपासून 90 किलोमीटर या गावातील गावकऱ्यांचे नातेवाईक आता आम्ही तुमच्याकडे येणार नाही, आम्हाला लागण होईल असे सांगतात. आमच्या गावाचे नाव कित्येक वर्षांपासून आहे, पण आता आम्हाला जणू वाळीत टाकण्यात आले आहे, असेही काही गावकरी सांगतात. नऊ हजार लोकसंख्या असलेल्या गावात शाळा आहे, एवढेच नव्हे तर राज्यातील प्रगत गावात याची गणना होते, पण आता येथील गावकरी गावाचे नाव बदलण्यासाठी आग्रह धरणार आहेत.

कोरोनाची सद्यस्थिती काय? वाचा एका क्लिकवर!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com