वाहन चालविताना मोबाईल वापरणे बेकायदा नाही 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 मे 2018

कायद्यात तरतूद नाही 
वाहन चालवताना मोबाईलवर बोलण्यास बंदी असल्याची कायद्यात तरतूद नसल्याचे केरळ उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने स्पष्ट केले. वाहन चालवताना मोबाईल वापरल्याने सार्वजनिक किंवा खासगी मालमत्तेचे नुकसान होते, असे म्हणता येत नाही. म्हणून कलम 118(ई) येथे लागू करता येणार नाही, असे खंडपीठाने नमूद केले. 

कोची, ता. 17 (वृत्तसंस्था) : वाहन चालवताना मोबाईलचा वापर केल्यास पोलिस संबंधित वाहनचालकांना अडवून त्यांच्याकडून दंडवसुली करतात. मात्र, मोबाईल वापरावरील बंदीचा कायदाच नसल्याने वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे बेकायदा नाही, असे केरळ उच्च न्यायालयाने एका प्रकरणात निकाल देताना स्पष्ट केले. 

वाहन चालविताना जोपर्यंत लोकांची सुरक्षा धोक्‍यात येत नाही, तोपर्यंत त्याला बेकायदा म्हणू शकत नाही. त्यामुळे हा गुन्हा नसल्याचे केरळ उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. संतोष एम. जे. ही व्यक्ती 26 एप्रिल 2017 रोजी संध्याकाळी पावणेसहा वाजता वाहन चालवताना मोबाईलवर बोलत होती. त्यासाठी त्याला वाहतूक पोलिसांनी दंड ठोठावला होता. त्याविरुद्ध संतोषने स्थानिक न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने वाहन चालवताना मोबाईल वापरणे ही बाब केरळ पोलिस कायद्याच्या कलम 118(ई) नुसार बेकायदा ठरवली. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात दाद मागितली. 

उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश शफीक आणि न्यायाधीश पी. सोमराजन यांच्या खंडपीठाने वाहन चालवताना मोबाईलचा वापर बेकायदा नाही, असा निकाल दिला. त्यासाठी 2012च्या एका निकालाचा आधार घेण्यात आला. 

कायद्यात तरतूद नाही 
वाहन चालवताना मोबाईलवर बोलण्यास बंदी असल्याची कायद्यात तरतूद नसल्याचे केरळ उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने स्पष्ट केले. वाहन चालवताना मोबाईल वापरल्याने सार्वजनिक किंवा खासगी मालमत्तेचे नुकसान होते, असे म्हणता येत नाही. म्हणून कलम 118(ई) येथे लागू करता येणार नाही, असे खंडपीठाने नमूद केले. 

Web Title: It is not illegal to use mobile phones while driving