8 राज्यांमध्ये दहशतवादी हल्ल्याची अफवा, कर्नाटक पोलिसांचे स्पष्टीकरण

airport
airport

बंगळूर : श्रीलंकेमध्ये ईस्टर डेच्या दिवशी झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशात देखील दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. बंगळूरू पोलिस ठाण्यात एका व्यक्तिनं 8 राज्यांमध्ये दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याची माहिती दिली होती. पण ही अफवा असल्याचे निष्पन्न झाले आहे. कर्नाटक पोलिसांनी ही माहिती सांगितली.

फोनवरून माहिती देणाऱ्या व्यक्तिनं 19 दहशतवादी तामिळनाडूमधील रामनाथपूरम येथे असल्याची देखील माहिती दिली आहे. ईस्टर डेच्या दिवशी श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जवळपास 253 लोकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यानंतर आता देशात देखील दहशतवादी हल्ल्याची शक्यता लक्षात घेत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रमख ठिकाणांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये देखील वाढ करण्यात आली होती.

तामिळनाडूमधील रामनाथपूरम येथे 19 दहशतवादी लपून बसल्याची माहिती देखील यावेळी फोन करणाऱ्या व्यक्तिनं दिली. मूर्ती हे ट्रेक ड्रायव्हर असल्याचा कळतंय. स्वामी सुंदर मूर्ती असं या फोन करणाऱ्या व्यक्तिचं नाव आहे. शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता स्वामी सुंदर मूर्ती यानं बंगळूरू पोलिस ठाण्यात फोन करून त्याबाबतची माहिती दिली. दहशतवादी हे ट्रेनमध्ये हल्ला करू शकतात अशी माहिती फोनवरून देण्यात आली होती. त्यानंतर सुरक्षा व्यवस्थेमध्ये देखील वाढ केली गेली.

दरम्यान, एका व्यक्तिनं चेन्नई पोलिसांना फोन करून तामिळनाडूतील प्रसिद्ध पंबन सी ब्रिज उडवण्याची धमकी देखील दिली आहे. यानंतर बॉम्ब शोधक पथकाच्या साहाय्यानं सर्च ऑपरेशन करण्यात आलं. श्रीलंकेतील हल्ल्यानंतर भारतानं आपल्या सागरी सीमांच्या सुरक्षेमध्ये देखील वाढ केली आहे. प्रमुख ठिकाणी तपासणी आणि सुरक्षा व्यवस्थेत देखील वाढ करण्यात आली आहे. त्यासोबतच मुंबईमध्येही हायअलर्ट जरी करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com