लोकशाहीचे हे 'मोदी मॉडेल' का?: केजरीवाल

वृत्तसंस्था
मंगळवार, 30 ऑगस्ट 2016

नवी दिल्ली - काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यावरून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका कर "लोकशाहीचे हे "मोदी मॉडेल‘ आहे का?‘ असा प्रश्‍न उपस्थित केला आहे.

नवी दिल्ली - काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यावरून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका कर "लोकशाहीचे हे "मोदी मॉडेल‘ आहे का?‘ असा प्रश्‍न उपस्थित केला आहे.

दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी दिल्ली सरकारमधील विविध विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर केजरीवाल यांनी ट्‌विटरद्वारे नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, "आज नायब राज्यपालांनी काही अधिकाऱ्यांच्या परस्पर बदल्या केल्या. त्यासंबंधित फाईल्स मुख्यमंत्र्यांना किंवा अन्य कोणत्याही मंत्र्याला दाखविल्या नाहीत.‘ असे म्हणत त्यांनी "हे लोकशाहीचे "मोदी मॉडेल‘ आहे का?‘ असा प्रश्‍न उपस्थित केला आहे.

"उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी नायब राज्यपालांचे पाय धरून त्यांनी मोहल्ला क्‍लिनिक आणि शाळांची निर्मिती करत असलेल्या सचिवांची 31 मार्चपर्यंत बदली करू नये, असे सांगितले होते. मात्र त्यांनी ऐकले नाही‘, असेही केजरीवाल यांनी दुसऱ्या एका ट्विटद्वारे सांगितले आहे.

Web Title: It's democracy 'Modi model' ?: Kejriwal

फोटो गॅलरी