राहुल गांधींवर 'पप्पू' नव्हे तर पापा होण्याची वेळ : आठवले

रविंद्र खरात 
रविवार, 16 डिसेंबर 2018

मोदी सरकार पुन्हा सत्तेत येणार

विरोधीपक्षांच्या नेत्यांचे मन एकत्र नसल्याने ते लोकसभा जिंकू शकणार नाहीत. काँग्रेसला 100 ही जागा मिळणार नाहीत. मात्र, मोदी सरकार पुन्हा येईल,

- रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री

कल्याण : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर 'पप्पू' नव्हे तर पापा होण्याची वेळ आली आहे. म्हणून आता त्यांनी लग्न करावे, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कल्याण येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आज (रविवार) दिला.

कल्याण येथील एका कार्यक्रमासाठी जाण्यापूर्वी रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत चर्चा केली. राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीवर बोलताना ते म्हणाले, "या निवडणुकांच्या निकालाने आगामी लोकसभा निवडणुकीत काडीमात्र फरक पडणार नाही, असे सांगत तेथे भाजपचा पराभव झाला असेल. मात्र, नरेंद्र मोदी हरले नाहीत''. तसेच ते पुढे म्हणाले, ''त्या निवडणुकांनंतर आम्ही चिंतन करत जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. यावेळी निवडणूक काळात भाजपसहित अन्य पक्षाने राहुल गांधी यांना 'पप्पू' म्हणून खिल्ली उडवली. मात्र, त्यांनी विधानसभा निवडणुकीत आपली ताकद दाखवली. यावर मिश्किलपणे आठवले म्हणाले, राहुल गांधी 'पप्पू' नव्हे तर आता पापा बनण्याची वेळ आली आहे. त्यासाठी त्यांनी लग्न करायला हवे''. 

दरम्यान, केंद्र सरकारमध्ये नितीन गडकरी आणि स्वतः च्या विभागामार्फत होणाऱ्या कामांचा आढावा सांगत ते म्हणाले, महागाई, जीएसटीबाबत नागरिकांमध्ये निश्चितपणे नाराजी आहे. ती दूर करण्याची तयारी सुरू असून त्याचा फायदा लोकसभा निवडणुकीत नक्कीच होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

जलसी निर्माण झाल्याने माझ्यावर हल्ला

अंबरनाथ येथे ज्याप्रकारे माझ्यावर हल्ला झाला, अशी घटना घडू नये यासाठी विशेष लक्ष देणार आहे. जेव्हा एखादा नेता मोठा होतो, तेव्हा जलसी निर्माण होते. या जलसीतूनच माझ्यावर हल्ला झाला. हल्लेखोर माझ्या समाजाचा असलातरी त्याने का केले? त्याबाबत पोलिस तपास करत आहेत. माझे संरक्षण वाढविण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे, असेही ते म्हणाले. 

...तर शिवसेनेचे नुकसान

कोस्टल रोड हा फायद्याचा असून, शिवसेना-भाजपमधील जलसी कमी झाल्यास दोन्ही पक्षाला फायदा आहे. आगामी काळात त्यांनी युती करून लढल्यास हे फायद्याचे ठरेल. मात्र, युती न केल्यास शिवसेनेचे नुकसान होईल, असे आठवले म्हणाले. तसेच जनतेचे भ्रमनिराश दूर करण्यासाठी सेना-भाजप एकत्र आणण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले. 

मोदी सरकार पुन्हा सत्तेत येणार

विरोधीपक्षांच्या नेत्यांचे मन एकत्र नसल्याने ते लोकसभा जिंकू शकणार नाहीत. काँग्रेसला 100 ही जागा मिळणार नाहीत. मात्र, मोदी सरकार पुन्हा येईल, असेही ते म्हणाले.

Web Title: Its not the time to become Pappu on Rahul Gandhi its time to become Father says Ramadas Athawale