आता भारतात विमानप्रवासामध्येही तुम्ही इंटरनेट वापरू शकता! 

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 मे 2018

नवी दिल्ली : विमानप्रवासामध्ये असतानाही दूरध्वनी करणे आणि इंटरनेटचा वापर करणे आता भारतातही शक्‍य होणार आहे. यासंदर्भातील बहुप्रतिक्षित प्रस्तावास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. येत्या तीन-चार महिन्यांत विमानप्रवासात इंटरनेट वापरणे शक्‍य होऊ शकेल, असा प्राथमिक अंदाज आहे. 

प्रवासादरम्यान विमान तीन हजार फूट उंचीवर गेल्यानंतर मोबाईल आणि इंटरनेट सेवा वापरता येऊ शकेल, अशी तरतूद या प्रस्तावात आहे. टेलिकॉम सचिव अरुणा सुंदरराजन यांच्या अध्यक्षतेखालील विविध मंत्रालयांच्या समन्वय समितीने या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. 

'या सुविधांचा वापर करण्यासाठी टेलिकॉम कंपनी, विमानकंपनी आणि इतर घटकांमध्ये समन्वय असावा लागेल. ही यंत्रणा अस्तित्त्वात येण्यासाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागू शकेल', असे सुंदरराजन यांनी सांगितले आहे. 

यापूर्वी 'ट्राय'नेही या प्रस्तावास मंजुरी दिली होती. या प्रस्तावातील इतर तरतुदी अद्याप स्पष्ट झाल्या नसल्या, तरीही विमानप्रवासादरम्यान मोबाईल किंवा इंटरनेट वापरण्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागण्याची शक्‍यता आहे. नियमित प्रवाशांना लाभ देण्यासाठी कालांतराने टेलिकॉम कंपन्या 'पॅकेज'ही आणू शकतील, असा अंदाज आहे.

Web Title: Its possible to make calls and browse internet during flights in India