'तृणमूल'च्या नेत्यांना मारहाण

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

गुवाहटी : तृणमूल काँग्रेसच्या सहा नेत्यांना आणि दोन आमदारांना सिलचर विमानतळावर मारहाण करण्यात आली. त्यावर बोलताना तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रियन यांनी सांगितले, की तृणमूलने गृहमंत्रालयाला याबाबत राज्यसभेत विधान करण्यास सांगितले होते. मात्र, राजनाथसिंह आले नाहीत. आम्ही याविरोधात लढणार आहोत. ही एक मोठी आणीबाणीच आहे.  

तृणमूल खासदारांना सिलचर विमानतळावर मारहाण करण्यात आली. याबाबत तृणमूलच्या खासदाराने सांगितले, की सुखेंद्र सेखर राय, ककोळी घोष दस्तिदार, रत्ना दे नाग, नादिमूल. अर्पिता घोष, ममता बाळा ठाकूर, फिरहाड हकिम आणि महुआ मोईत्रा यांची टीम दुपारी विमानतळावरून निघत होती. जेव्हा सिलचर विमानतळावर पोचल्यानंतर जिल्हा दंडाधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांशी झटापट झाली. पोलिस कर्मचाऱ्यांनी आम्हाला मारहाण केली. त्यामुळे या मारहाणीत माझ्या छातीला मार लागला. 

तसेच पोलिसांनी काकोळी घोष दस्तीदार, ममता बाळा ठाकूर आणि महूआ मोईत्रा यांच्याशी गैरवर्तन केले, असा आरोप तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार सुखेंद्र सेखर राय यांनी केला. 

Web Title: Its super emergency says Derek O Brien