खासदार ई. अहमद यांचे निधन

वृत्तसंस्था
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली - राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या वेळी सेंट्रल हॉलमध्ये खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री ई. अहमद यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर मंगळवारी मध्यरात्री त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले.

सेंट्रल हॉलमध्ये संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपतींचे अभिभाषण ऐकताना अहमद यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि ते खुर्चीवरून कोसळले. संसदेच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना तत्काळ उचलले आणि रुग्णवाहिका पाचारण केली. त्यांना राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर त्यांनी मध्यरात्री अखेरचा श्वास घेतला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अहमद यांच्या निधनानंतर दुःख व्यक्त करण्यात आले आहे. तर, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

केरळमधील मलाप्पुरम लोकसभा मतदारसंघाचे इंडियन युनियन मुस्लिम लीगचे प्रतिनिधित्त्व करणारे 78 वर्षीय अहमद यांनी यूपीए-1 आणि यूपीए-2 च्या सरकारमध्ये सलग दहा वर्षे परराष्ट्र राज्यमंत्री म्हणून काम पाहिले.

Web Title: IUML mp e ahamed passes away