इव्हांकाने घातला पुन्हा तोच ड्रेस, किंमत माहितीये?

वृत्तसंस्था
Tuesday, 25 February 2020

इव्हांका ज्या ड्रेसमध्ये भारतात दाखल झाली, तो ड्रेस तिने 2019 मध्येच खरेदी केलेला आहे. अर्जेंटिना दौऱ्यादरम्यान तिने फ्रॉक सूट प्रकारातील हा ड्रेस खरेदी केला होता. या ड्रेसची किंमत 1 लाख 71 हजार 331 रुपये (2385 डॉलर) इतकी आहे.

नवी दिल्ली : दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इव्हांकाही त्यांच्यासोबत आली आहे. त्यांच्या या दौऱ्याबाबत चर्चा होत असताना इव्हांकाने घातलेल्या ड्रेस हा तिने वर्षभरापूर्वी खरेदी केलेला असून, त्याची किंमत तब्बल 1 लाख 71 हजार रुपये एवढी असल्याचे समोर आले आहे.

ट्रम्प यांच्यासह त्यांची पत्नी मेलानिया मुलगी इव्हांका जावाई कुश्नेर हे सोमवारी सकाळी भारतात दाखल झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अहमदाबाद विमानतळावर स्वागत केले. ट्रम्प यांनी साबरमती आश्रमाला भेट दिल्यानंतर मोटेरा स्टेडियमपर्यंत रोड शो केला. यानंतर तेथे झालेल्या कार्यक्रमात मोदींचे कौतुक करताना अनेक आठवणींना उजाळा दिला.

इव्हांका ज्या ड्रेसमध्ये भारतात दाखल झाली, तो ड्रेस तिने 2019 मध्येच खरेदी केलेला आहे. अर्जेंटिना दौऱ्यादरम्यान तिने फ्रॉक सूट प्रकारातील हा ड्रेस खरेदी केला होता. या ड्रेसची किंमत 1 लाख 71 हजार 331 रुपये (2385 डॉलर) इतकी आहे. ट्रम्प यांनीही लेमन यलो कलरचा टाय परिधान केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ivanka Trump repeats 1.7 lakh Argentina trip dress for India visit