जम्मु काश्‍मीर: जवानाकडून लष्करी अधिकाऱ्याची गोळी झाडून हत्या

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 जुलै 2017

थापा यांनी जवानाचा मोबाईल फोन जप्त करत त्याला कडक इशारा दिला. तसेच यावेळी झालेल्या वादामध्ये या मोबाईल फोनचेही नुकसान झाले. यामुळे संतापलेल्या जवानाने थापा यांच्या पाठीवर थेट दोन गोळ्या झाडल्याचे सूत्रांनी सांगितले

नवी दिल्ली - जम्मु काश्‍मीर राज्यामधील उरी सेक्‍टर येथे आज (मंगळवार) भारतीय लष्करामधील एका जवानाने मेजर दर्जाच्या अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली.

मेजर शिखर थापा असे मृत झालेल्या अधिकाऱ्याचे नाव असून थापा यांची नेमणूक उरी येथे तैनात असलेल्या 8 राष्ट्रीय रायफल्स या विभागामध्ये करण्यात आली होती. आहे. मोबाईल फोन वापरण्यासंदर्भात उद्‌भविलेल्या वादातून ही दुदैवी घटना घडल्याचे सूत्रांनी सांगितले.

संबंधित जवान कामाच्या वेळी मोबाईल फोन वापरत असल्याचे चौकशीत आढळून आले. यामुळे थापा यांनी जवानाचा मोबाईल फोन जप्त करत त्याला कडक इशारा दिला. तसेच यावेळी झालेल्या वादामध्ये या मोबाईल फोनचेही नुकसान झाले. यामुळे संतापलेल्या जवानाने थापा यांच्या पाठीवर थेट दोन गोळ्या झाडल्याचे सूत्रांनी सांगितले.

या प्रकरणी सविस्तर माहितीची अद्यापी प्रतीक्षा आहे.

Web Title: J-K: Army Major shot dead by jawan