जॅकेट फॅक्टरीला भीषण आग; 12 ठार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

गाझियाबाद- येथील साहिबाबाद परिसरातील एका जॅकेट कारखान्याला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागली. या घटनेत 12 लोकांचा मृत्यू झाला असून, अनेक लोक आगीमध्ये भाजले गेले आहेत. 

आग लागल्याची सूचना मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या आणि पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू करण्यात आले. अद्याप आग लागण्यामागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. 

साहिबाबादमधील जयपाल चौकानजीक शहीदनगर येथे असलेल्या या तीन मजली जॅकेट कारखान्यात पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. यामुळे तिथे झोपलेल्या 12 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये जखमी झालेल्या दोन लोकांची स्थिती गंभीर असून, त्यांना नजीकच्या जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
 
Web Title: jacket factory catches fire in Gaziabad, 12 dead