जॅकी श्रॉफ, अर्जुन रामपाल भाजपच्या मार्गावर

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 जानेवारी 2017

नवी दिल्ली- अभिनेता जॅकी श्रॉफ व अर्जुन रामपाल हे  लवकरच भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत, अशी माहिती सूत्रांनी आज (मंगळवार) दिली.

श्रॉफ व रामपाल हे दिल्लीतील भाजप कार्यालयात जाऊन भाजपचे महासचिव कैलाश विजयवर्गीय यांची भेट घेणार आहेत. या भेटीनंतर अंतिम निर्णय होणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, उत्तर प्रदेशात पुढील महिन्यात सात टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. यापार्श्वभूमिवर दोघांनी पक्षात प्रवेश करून पक्षाचा प्रचार केल्यास पक्षाला फायदा होण्याची शक्यता आहे.

Web Title: Jackie Shroff and Arjun Rampal likely to join BJP