
केंद्राला जलसमाधीचा इशारा देणाऱ्या जगद् गुरू परमहंसाचार्यांना ताजमहालबाहेर रोखले
नवी दिल्ली : अयोध्येहून आग्रा येथे ताज महल बघण्यासाठी आलेल्या जगद् गुरू परमहंसाचार्य यांनी आपल्याला आत जाण्यास रोखल्याचा दावा केला आहे. हातात ब्रम्हदंड आणि भगवे कपडे परिधान केलेले असल्यानेच आपल्याला आत जाण्यापासून रोखल्याचे त्यांनी म्हंटले आहे. दरम्यान, जगद्गुरूंना लोखंडी ब्रह्मदंड आत नेण्यास मनाई करण्यात आल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला असून, या सर्व प्रकरणात वाद वाढल्यानंतर अधिकाऱ्यांनी माफीही मागितल्याचे समजत आहे. या सर्व घटनेबाबत बोलताना जगद् गुरू परमहंसाचार्य म्हणाले की, आपण ताजमहाल पाहण्यासाठी शिष्यांसह आलो होतो त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या CRPF च्या जवानांनी हातातील ब्रम्हदंड आणि भगव्या कपड्यांबाबत आक्षेप घेतल्याचे परमंहसाचार्य यांनी सांगितले. (Jagadguru Paramhans Acharya News)
हेही वाचा: LICचा IPO ४ मे रोजी होणार लाँच, असा करा अर्ज
आशीर्वाद देऊन जगद् गुरू परमहंसाचार्य माघारी फिरले
दरम्यान, या सर्व घडामोडींनंतर जगद् गुरू परमहंसाचार्य यांनी त्यांच्याकडील तिकिटं तेथील इतर पर्यटकांना देण्यात आली. तसेच त्यांना याचे पैसेही परत करण्यात आल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, या घटनेनंतर आचार्यांनी तेथील उपस्थितांना आशीर्वाद देऊन माघारी परत जाण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा: अलर्ट राहणं गरजेचं, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत PM मोदींचे विधान
जगद् गुरू परमहंसाचार्य यांनी केली होती हिंदू राष्ट्राची मागणी
काही महिन्यांपूर्वीच जगद् गुरू परमहंसाचार्य यांनी भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी केली होती. तसेच याबाबत सरकारला अल्टिमेटम देत ही मागणी पूर्ण न झाल्यास जलसमाधी घेण्याचा इशार त्यांनी दिला होता. परंतु, जलसमाधी घेण्यापूर्वीच त्यांना अटक करण्यात आली होती. 2 ऑक्टोबरपर्यंत हिंदू राष्ट्र घोषित न केल्यास जलसमाधी घेण्याचा इशार त्यांनी सरकारला दिला होता. मात्र, त्यापूर्वीच त्यांना अटक करण्यात आली होती.
Web Title: Jagadguru Paramhans Acharya Not Allowed To Enter In Taj Mahal
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..