जगनमोहन रेड्डींनी घेतली मोदींची भेट; शपथविधी सोहळ्याचे दिले आमंत्रण

वृत्तसंस्था
रविवार, 26 मे 2019

ध्रप्रदेशात प्रचंड बहुमत मिळवत सत्ता स्थापनेच्या मार्गावर असलेल्या वायएसआर काँग्रेस प्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी रविवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत रेड्डी यांना पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा देत, आपल्या शपथविधी सोहळ्यास येण्याचे आमंत्रणही दिले.

नवी दिल्ली: आंध्रप्रदेशात प्रचंड बहुमत मिळवत सत्ता स्थापनेच्या मार्गावर असलेल्या वायएसआर काँग्रेस प्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी रविवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत रेड्डी यांना पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा देत, आपल्या शपथविधी सोहळ्यास येण्याचे आमंत्रणही दिले.

वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी हे 30 मे रोजी आंध्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. जगनमोहन यांच्या पक्षाला विधानसभेच्या 175 जागांपैकी 151 जागांवर विजय मिळाला आहे. तर या निवडणूकीत चंद्राबाबू नायडू यांचा पक्ष तेलगू देसम पक्षाला केवळ 23 जागांवर समाधान मानावे लागले आहे.

सत्ताधारी तेलगू देसम पक्षाचा पराभव झाल्याने आंध्रात सत्तापरिवर्तन झाले असून विधानसभेबरोबरच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही वायएसआर काँग्रेसची उत्तम कामगिरी राहिली. लोकसभेच्या 25 जागांपैकी तब्बल 22 जागांवर त्यांना विजय मिळाला आहे. चंद्राबाबूंच्या तेलगू देसम पक्षाला केवळ 03 जागा मिळाल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jagan Reddy Meets PM Modi In Delhi