उत्तर कर्नाटकावर अन्यायच - जगदीश शेट्टर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

बेळगाव - सुवर्णसौधमध्ये कार्यालय स्थलांतर संदर्भातील प्रस्ताव धूळ खात पडला आहे, शेतकऱ्यांची थकीत बिले अदा झाली नाहीत, त्यामध्ये अलिकडे उत्तर कर्नाटकातील नेत्यांना विधानपरिषदेच्या सभापती पदापासून वंचित ठेवण्यात आहे. उत्तर कर्नाटकामधील भागावर केलेला आणखी एक अन्याय असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी केला. 

बेळगाव - सुवर्णसौधमध्ये कार्यालय स्थलांतर संदर्भातील प्रस्ताव धूळ खात पडला आहे, शेतकऱ्यांची थकीत बिले अदा झाली नाहीत, त्यामध्ये अलिकडे उत्तर कर्नाटकातील नेत्यांना विधानपरिषदेच्या सभापती पदापासून वंचित ठेवण्यात आहे. उत्तर कर्नाटकामधील भागावर केलेला आणखी एक अन्याय असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी केला. 

उत्तर कर्नाटक भागातील विविध विषयावर आज (ता.१८) चर्चा झाली. यावेळी ते बोलत होते. शेट्टर म्हणाले, ‘बेळगावात स्वामींच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी आंदोलकांसोबत बैठक घेतली. नजीकच्या कालावधीत बेळगाव सुवर्णसौधला विविध कार्यालयांचे स्थलांतर करू, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. त्यासाठी आमदार बसवराज होरट्टी यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापली.

समितीने सात कार्यालय स्थलांतर संदर्भात अहवाल दिला. पण, कार्यवाही झालेली नाही. कार्यालय स्थलांतर विषय प्रलंबित आहे. त्यामुळे खोटी आश्‍वासने सरकारकडून मिळत आहेत. दिशाभूल केली जाते आहे. बेळगावसह उत्तर कर्नाटकामध्ये सर्वाधिक ऊस उत्पादक आहेत. त्यांचे पंधरा दिवसांत बिल मिळेल, असे सांगितले अलून आजतगायत बिले मिळाली नाहीत.

उत्तर कर्नाटकातील जिव्हाळ्याचे प्रश्‍न प्रलंबित असल्याची तक्रार एकीकडे केली जात असताना आणखी आघात झाला. विधान परिषदेच्या हंगामी अध्यक्षपदी बसवराज होरट्टी होते. होरट्टी आठवेळा आमदार झाले आहेत. त्यांना पायउतार करायला सांगून त्याठिकाणी शेट्टी यांची नियुक्ती केली आहे. येथे एस. आर. पाटील यांच्या नावाची चर्चा होती. पण, पाटील हे उत्तर कर्नाटकाचे असल्यामुळे त्यांना डावलले, असा आरोप शेट्टर यांनी केला आहे.

नव्या तालुक्‍यांना निधी कधी?
नवीन उदयास आलेल्या तालुक्‍यांना निधी उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे तहसीलसह तालुका कार्यालयांना क्रियाशील बनविताना अडचणी येताहेत. नंजुडाप्पा अहवालानुसार मागास ११४ तालुक्‍यांसाठी ठोस योजना सरकारने आखलेली नाही. भौगोलिकदृष्ठ्या या भागातील तालुके मोठे आहेत. त्यामुळे निधी, विकासयोजना अचूकपणे राबविणे जरुरी आहे. त्यानंतरच उत्तर कर्नाटक भागावरील होणारा अन्याय दूर होईल, असे शेट्टर यांनी सांगितले.

Web Title: Jagdish Shettar comment