
या घटनेत आठ पोलिस कर्मचारी आणि एका नागरिकासह नऊ जण जखमी झाले आहेत.
Jahangirpuri Violence : जहांगीरपुरी हिंसाचार प्रकरणात आता ED ची एन्ट्री
नवी दिल्ली : जहांगीरपुरी हिंसाचार (Jahangirpuri Violence) प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाची (ED inquiry) देखील एन्ट्री होऊ शकते. आता ईडी मुख्य आरोपी अन्सारवर मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करण्याची शक्यता आहे. खरंतर, दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना (Police Commissioner Rakesh Asthana) यांनी अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) पत्र लिहून जहांगीरपुरी हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी अन्सारवर मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करण्यास सांगितलंय. जहांगीरपुरीचा रहिवासी असलेला अन्सार सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.
अस्लम आणि अन्सार हे दिल्लीतील जहांगीरपुरी इथं 16 एप्रिल रोजी धार्मिक मिरवणुकीत झालेल्या हिंसाचारातील मुख्य आरोपी आहेत. या घटनेत आठ पोलिस कर्मचारी आणि एका नागरिकासह नऊ जण जखमी झाले आहेत. गेल्या आठवड्यात कोर्टात हजेरी लावताना दिल्ली पोलिसांनी आरोप केला होता की, मुख्य आरोपी अन्सार आणि अस्लम यांना 15 एप्रिलला होणाऱ्या 'शोभा यात्रा'ची आधीच माहिती होती. यामुळंच या दोघांनी शोभा यात्रेदरम्यान हिंसाचाराचं 'षडयंत्र' रचलं होतं. आम्हाला सीसीटीव्ही फुटेज पाहून या प्रकरणात सहभागी असलेल्या इतरांची ओळख पटवावी लागली, असंही दिल्ली पोलिसांनी सांगितलं होतं.
हेही वाचा: मोठी बातमी! मुख्यमंत्री सोरेन यांच्या मालमत्तेची ईडीव्दारे होणार चौकशी
हिंसाचार आणि अतिक्रमणविरोधी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर, दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) कडक नजर ठेवण्यासाठी जहांगीरपुरी परिसरात अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. उत्तर दिल्ली महानगरपालिकेनं राष्ट्रीय राजधानीतील जहांगीरपुरी इथं राबविलेल्या अतिक्रमणविरोधी मोहिमेवर सुप्रीम कोर्टानं आपला निर्णय कायम ठेवला आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी हिंसाचारग्रस्त भागात सुरक्षा व्यवस्था वाढवलीय.
Web Title: Jahangirpuri Violence Case Ed Entry Delhi Police Commissioner Handed Over Letter Of Action To Ed
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..