जिद्द: 14 वर्षे तुरूंगवास भोगल्यानंतर झाला डॉक्टर...

वृत्तसंस्था
Thursday, 20 February 2020

कारागृहामध्ये 14 वर्षे शिक्षा भोगल्यानंतर पुढे शिक्षण घेतल्यानंतर एक अवलिया डॉक्टर बनला आहे. डॉक्टर बनून रुग्णांची सेवा करत असलेल्या व्यक्तीचे नाव आहे सुभाष पाटील.

कर्नाटक : कारागृहामध्ये 14 वर्षे शिक्षा भोगल्यानंतर पुढे शिक्षण घेतल्यानंतर एक अवलिया डॉक्टर बनला आहे. डॉक्टर बनून रुग्णांची सेवा करत असलेल्या व्यक्तीचे नाव आहे सुभाष पाटील.

त्याने महिला डॉक्टरचा हात धरला अन्...

सुभाष पाटील हे कर्नाटकमधील कलबुर्गीमधील अफझलपुरचे रहिवासी आहेत. 1997 मध्ये एमबीबीएसकरता कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. मात्र, एका खुनाच्या घटनेत 14 वर्षे शिक्षा झाली होती. त्यावेळी ते  एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाला शिकत होते. हत्ये प्रकरणी २००६मध्ये त्यांना न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र, शिक्षा भोगत असताना कारागृहामध्ये सेवा सुरू केली होती. चांगल्या वर्तणुकीमुळे तुरुंग प्रशासनाने १५ ऑगस्ट २०१६ त्यांची मुक्तता केली.  पुढे त्यांनी डॉक्टर होण्याचे स्वप्न पुर्ण करण्याचे ठरवले. चार वर्षांत एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले आणि 2019 मध्ये सुभाष पाटील हे 40व्या वर्षी डॉ. सुभाष पाटील झाले. एक वर्षाची इंटर्नशीपही पूर्ण केली असून, आता ते पूर्णवेळ वैद्यकीय सेवेत रुजू झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jailed for 14 Years Man fulfils dream of becoming doctor