बेरोजगारी विरोधात अपक्ष आमदाराचे अनोखे आंदोलन; काळे कपडे घालून 12 तास जॉगिंग

बलजीत यादव अपक्ष आमदार असून त्यांनी गेहलोत सरकारला समर्थन दिलेले आहे.
बेरोजगारी
बेरोजगारीटिम ई सकाळ

जयपूर : शैक्षणिक पेपर फुटणे, बेरोजगारी आणि शिक्षण व्यवस्थेतील अनियमितता यापूर्वी अनेकदा अनेकांनी आंदोलन करत निषेध नोंदवला आहे. मात्र, राजसथानच्या एका अपक्ष आमदाराने काळे कपडे परिधान करून जयपूरच्या सेंट्रल पार्कमध्ये चक्क 12 तास जॉगिंग करत या सर्व घटनांचा निषेध नोंदवला आहे. बलजीत यादव असे या आमदाराचे नाव आहे. विशेष म्हणजे बलजीत यादव यांनी गेहलोत सरकारला समर्थन दिलेले आहे. (MLA Baljeet Yadav Protest Against Unemployment )

बेरोजगारी
LIVE : सोमय्यांना पोलीस रोखणार? दापोली पोलीस ठाण्यात हालचालींना वेग

यादव हे जयपूरचे (Jaipur) जिल्हाधिकारी आणि रघुकुल विद्यापीठ सीकर प्रकरणात खोटे तपास अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांना अटक करण्याची मागणी करत गेहलोत सरकारचा (Gehlot Government )निषेध करत आहेत. याचाच एक भाग म्हणून त्यांनी काळे कपडे परिधान करून जयपूरच्या सेंट्रल पार्कमध्ये 12 तास न थांबता जॉगिंग (Jogging) केले आहे. बलजीत यादव म्हणाले की, मी अपक्ष आमदार असून, या सर्व घडणाऱ्या घटनांमुळे राज्यातील तरुणांचे किती हाल होत आहेत हे सरकारला सांगायचे आहे. विशेष म्हणजे बलजीत यादव यांनी गेहलोत सरकारला समर्थन दिलेले आहे. बलजीत यादव म्हणाले की, मी अपक्ष आमदार असून, या सर्व घडणाऱ्या घटनांमुळे राज्यातील तरुणांचे किती हाल होत आहेत हे सरकारला सांगायचे आहे.

बेरोजगारी
'RRR'ची 'द काश्मीर फाइल्स'ला जोरदार टक्कर

राजस्थान विधानसभेत गुरुवारी सार्वजनिक परीक्षा भरतीतील (Exam Paper) अनुचित संसाधने आणि कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी आणलेल्या विधेयकावरील चर्चेदरम्यान बलजीत यादव म्हणाले होते की, या विधेयकाचा काहीही उपयोग नाहीये, तसेच त्याचा काहीही फायदा होणार नाही. काही विद्यार्थी भेटायला आले होते, असे सांगत यादव म्हणाले की, REET परीक्षा लीक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या राम कृपालने परीक्षेत उत्तीर्ण होण्याच्या नावाखाली त्यांच्याकडे पैसे मागितले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com