"जीएसटी' विरोधात राजस्थानमध्ये "बंद'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 जून 2017

जयपूर : वस्तू व सेवाकराच्या (जीएसटी) विरोधात काही संघटनांनी पुकारलेल्या बंदला राजस्थानमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. जीएसटीची अंमलबजावणी आज रात्रीपासून होत असून, या पार्श्‍वभूमीवर हा बंद पुकारण्यात आला होता.

राज्यभरात मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांनी बंद पाळत आंदोलनात सहभाग नोंदविला. याबाबत व्यापारी संघटनांचे प्रवक्ते अरुण अगरवाल म्हणाले, की जीएसटी कररचनेत जादा कर असून, या करपद्धतीची प्रक्रिया गुंतागुंतीची आहे. त्यामुळे याला व्यापाऱ्यांचा विरोध आहे. आज पुकारण्यात आलेल्या बंदला राज्यभरात व्यापाऱ्यांना चांगला प्रतिसाद दिला. जयपूर, उदयपूर, अलवार, सिकर, जोधपूर, कोटा आणि अन्य जिल्ह्यांतील व्यापाऱ्यांनी बंदमध्ये मोठा सहभाग नोंदविला. राज्यातील व्यापाऱ्यांनी सर्व व्यवहार बंद ठेवत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

Web Title: jaipur news gst and rajasthan