जयपूरमध्ये 2.16 कोटी रुपयांच्या नोटा जप्त

वृत्तसंस्था
सोमवार, 12 डिसेंबर 2016

जयपूर- आयकर विभागाने शहरामध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी घातलेल्या छाप्यात 2.16 कोटी रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये दोन हजार रुपयांच्या नोटेचा समावेश आहे, अशी माहिती अधिकाऱयांनी आज (सोमवार) दिली.

एका सहकारी बॅंकेत घातलेल्या छाप्यात 1.56 कोटी रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये 1.38 कोटींच्या दोन हजार रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. दुसरा छापा वैशाली नगर येथे टाकण्यात आला. एका मोटारीमधून 60 लाख रुपये जप्त करण्यात आले असून, यामध्ये 56 लाख रुपयांच्या दोन हजारांच्या नोटा आहेत.

दोन्ही छाप्यांदरम्यान 2.16 कोटी रुपये जप्त करण्यात आले असून, 1.38 कोटींच्या दोन हजारांच्या नोटा आहेत. याबाबत संबंधितांना ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे, असे अधिकाऱयांनी सांगितले.

Web Title: Jaipur: seize Rs 2.16 crore including new notes