esakal | काश्मीरला वेगळा देश करायचाय; पाकमध्ये ट्रेनिंगच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांचा खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

terrorist.

स्पेशल सेल डीसीपी संजीव यादव यांच्या म्हणण्यानुसार, त्यांची टीम दहशतवादी हालचालींवर बारिक लक्ष ठेवून आहे.

काश्मीरला वेगळा देश करायचाय; पाकमध्ये ट्रेनिंगच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांचा खुलासा

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- नवी दिल्लीतील क्षेत्र, विदेशी दूतावास, चर्च, धार्मिक स्थळ आणि मोठ्या हॉटेलना टार्गेट करण्याच्या इराद्यात असणाऱ्या जैश-ए-मोहम्मदच्या (Jaish-e-Mohammed) दोन दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली. पकडण्यात आलेल्या आरोपींची ओळख लतीफ मीर (वय 22) आणि मोहम्मद अशरफ खटाना (वय 20) अशी आहे. हे दोन्ही दहशतवादी बारामुला आणि कुपवाडाचे रहिवाशी आहेत. यांची योजना पाकिस्तानमध्ये जाऊन ट्रेंनिग घेण्याची होती. त्यांनी अनेकवेळा बॉर्डर क्रॉस करुन पाकिस्तानमध्ये जाण्याचाही प्रयत्न केला आहे. 

स्पेशल सेल डीसीपी संजीव यादव यांच्या म्हणण्यानुसार, त्यांची टीम दहशतवादी हालचालींवर बारिक लक्ष ठेवून आहे. 16 नोव्हेबरला स्पेशल सेलला दोन दहशतवाद्यांसंबंधी इनपुट मिळाला होता. यानंतर स्पेशल सेलने ट्रॅप लावून त्या दोघांना पकडले. त्यांच्याकडे दोन सेमी ऑटोमॅटिक पिस्तुल, 10 जिवंत काडतूसे, दोन मोबाईल आणि अन्य सामान सापडले आहे. 

ज्यो बायडेन यांच्या कॅबिनेटमध्ये दोन भारतीयांना संधी?

चौकशीत कळाले की, दोन्ही दहशतवादी दिल्लीतील अनेक जागी दहशतवादी हल्ले करणार होते. त्यांच्या निशाण्यावर अनेक व्हीव्हीआयपी होते. दोन्ही दहशतवादी पाकसोबत जोडले गेले होते. दोन्ही दहशतवादी देवबंद आणि सहारनपूरमध्येही गेले होते. काश्मीरला स्वतंत्र देश बनवण्याची त्यांची इच्छा होती, जम्मू-काश्मीरला लागू असलेले कलम 370 काढण्यात आल्याने ते नाराज होते. त्यामुळेच ते पाकिस्तानमध्ये जाऊन ट्रेनिंग घेणार होते. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुण दहशतवादी गटात सामील झाले होते. त्यांचा रोल मॉडल जैश-ए-मोहम्मदचा लिडर मौलामा मसूद अजहर आहे. अब्दुल लतीफ मीरने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर मौलान मसूद अजहरचा फोटो लावला आहे. लतीफ मीर मसूद अजहरची भाषणं ऐकायचा आणि त्याचा इरादा जम्मू-काश्मीरला स्वातंत्र्य करणे आणि इस्लाम धर्माचा प्रचार-प्रसार जगभरात करण्याचा होता. दोन्ही दहशतवाद्यांना बॉर्डर क्रॉस करण्यासाठी पाकिस्तानमधील काही व्यक्तींकडून मदत केली जात होती.