सीएम धामींसह बरेली अन् हरिद्वार स्टेशन उडवणार; जैशची धमकी

पत्रानंतर सर्व रेल्वे स्थानकांवर सखोल तपासणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
 Terrorists
Terrorists Sakal

डेहरादून : उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांच्यासह महत्त्वाची रेल्वे स्टेशन बॉम्बने (Bomb) उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीचे पत्र पाठवणाऱ्याने स्वत:ला जैश-ए-मोहम्मदचा (Jaish-E-Mohammad) एरिया कमांडर सलीम अन्सारी असल्याचे म्हटले आहे. धमकीचे पत्र मिळताच पोलीस विभागाने तपास सुरू केला आहे. तर जीआरपी आणि आरपीएफ (RPF) अलर्ट झाले असून, सर्व रेल्वे स्थानकांवर सखोल तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच प्रत्येक संशयित प्रवाशाच्या सामानाची तपासणी करण्यात येत आहे. धमकीचे पत्र गांभीर्याने घेत रेल्वेने चौकशीचे आदेश दिले आहेत. (Jaish-E- Mohammad Threat Letter)

 Terrorists
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर गॅस टँकर उलटला, तिघांचा मृत्यू

याबाबत अधिक माहिती अशी की, उत्तर रेल्वेच्या रुरकी रेल्वे स्टेशनच्या मास्टरला रविवारी संध्याकाळी धमकीचे पत्र (Threat Letter ) मिळाले आहे. यामध्ये येत्या 21 मे रोजी बरेली, मुरादाबाद, रुरकी, लक्सर, डेहराडून, काठगोदाम, ऋषिकेश आणि हरिद्वार रेल्वे स्थानकांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर पत्रात हरिद्वारच्या अनेक धार्मिक स्थळांसह उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनाही बॉम्बने उडवण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 Terrorists
चंद्रकांत खैरेंचा नवनीत राणांना दम, म्हणाले मुख्यमंत्र्यांबद्दल वाईट...

पत्रात नेमका उल्लेख काय?

स्टेशन मास्तरला पाठवण्यात आलेल्या पत्रात येत्या २१ मे रोजी बरेली, मुरादाबाद, रुरकी, लक्सर, डेहराडून, काठगोदाम, ऋषिकेश आणि हरिद्वार रेल्वे स्थानके बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर पत्रात हरिद्वारच्या अनेक धार्मिक स्थळांसह उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनाही बॉम्बने उडवण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, धमकीचे पत्र पाठवणाऱ्याने स्वत:ला जैश-ए-मोहम्मदचा एरिया कमांडर सलीम अन्सारी असल्याचे सांगितले आहे. धमकी मिळाल्यानंतर आरपीएफ आणि जीआरपीने बरेली जंक्शनसह सर्व रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढवली असून, स्थानकासह रेल्वे गाड्यांमध्ये कसून तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.

यापूर्वीही अनेकादा धमक्या

रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी देण्याची ही पहिली घटना नाही. याआधीही अनेकवेळा रेल्वे स्थानकांवर बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली आहे. अलीकडेच सहारनपूर रेल्वे स्थानकालाही बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com