'राजकारणी म्हटल्यावर टीका सहन करायलाच हवी'

पीटीआय
सोमवार, 9 जानेवारी 2017

नवी दिल्ली: तुम्ही राजकारणी आहात म्हटल्यानंतर तुम्ही टीकेला सामोरे जाण्याची सवय ठेवायलाच हवी, असा सल्ला आप नेते राघव चढ्ढा यांनी आज (सोमवार) अर्थमंत्री अरुण जेटली यांना दिला.

जेटली यांनी आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यासह अन्य काही नेत्यांवर मानहानीचा दावा ठोकला असून यामध्ये चढ्ढा यांचाही समावेश आहे. दिल्ली उच्च न्यायालयात या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायाधीश दीपा शर्मा यांच्यासमोर चढ्ढा यांनी हे मत व्यक्त केले.

चढ्ढा यांनी न्यायालयात बोलताना मी जेटली यांना मानहानी होईल असे किंवा हानी पोचेल असे कोणतेही शब्द उच्चारले नसल्याचे सांगितले. मुख्य वकील उपस्थित नसल्यामुळे पुढील तारीख देण्याची मागणी त्यांच्या वकिलांनी केली. न्यायालयाने पुढील तपासणीसाठी 11 मे ही तारीख जाहीर केल्यानंतर जेटलींतर्फे बाजू मांडणाऱ्या ज्येष्ठ वकील प्रतिभा एम. सिंग आणि माणिक डोगरा यांनी ही सुनावणी जॉइंट रजिस्ट्रार यांनी दिलेल्या तारखेप्रमाणे सहा मार्चपूर्वीच घेण्याची विनंती केली. परंतु शर्मा यांनी त्याचा काहीही फरक पडणार नसल्याचे सांगितले.

दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनमधील गैरव्यवहाराबद्दलचे सर्व आरोप फेटाळले असून या आरोपांमुळे मानहानी झाल्याचा दावा केला आहे. 13 वर्ष जेटली या असोसिएशनचे अध्यक्ष होते. आपचे प्रमुख केजरीवाल आणि अन्य नेत्यांविरोधात त्यांनी 10 कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे.

Web Title: Jaitley should 'tolerate fair criticism': Raghav Chadda