राहुल गांधींनी 'GDP' ला 'हे' दिले नाव !

वृत्तसंस्था
शनिवार, 6 जानेवारी 2018

अर्थमंत्री जेटली आणि पंतप्रधान मोदी ही जीनियस जोडी देशाला विभाजनवादी राजकारणाकडे (जीडीपी) घेऊन जात आहे.

नवी दिल्ली - जीएसटीचे 'गब्बर सिंह टॅक्स' असे नामकरण केल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (शनिवार) जीडीपीचा अर्थ पंतप्रधान मोदींच्या मते 'ग्रॉस डिव्हिसिव्ह पॉलिटिक्स' (विभाजनवादी राजकारण) असल्याचे म्हटले आहे.

एकूण देशांतर्गत उत्पन्नामध्ये(जीडीपी) 2017-18 या वर्षातील वाढ 6.5 टक्के राहील, असा अंदाज केंद्रीय संख्याशास्त्र व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने आज जाहीर केले. 2016-17 मध्ये हा वाढीचा दर 7.1 टक्के होता. म्हणजेच यंदा त्यात अर्ध्या टक्‍क्‍याहून अधिक घट नोंदली जाणे अपेक्षित आहे. कृषि व संलग्नक्षेत्रांच्या वाढीचा दर 2.1 टक्के राहील असा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा दरही कमी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत औद्योगिक उत्पादनात देखील घसरण होण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात आली आहे. याच मुद्द्यावर ट्विट करत राहुल गांधींनी मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांना लक्ष्य केले आहे.

राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, की अर्थमंत्री जेटली आणि पंतप्रधान मोदी ही जीनियस जोडी देशाला विभाजनवादी राजकारणाकडे (जीडीपी) घेऊन जात आहे. यानंतर त्यांना अर्थव्यवस्था खराब होण्याचे आकडे दिले आहेत. 
 

Web Title: Jaitley's genius Narendra Modis GDP is equal to according to Rahul Gandhi