जलिकट्टू आंदोलनास वेगळे वळण देण्याचा प्रयत्न

वृत्तसंस्था
शनिवार, 28 जानेवारी 2017

ओ. पनीरसेल्वम; लवकरच कारवाईचे आश्‍वासन

चेन्नई: जलिकट्टूप्रकरणी मरिना सुमद्र किनाऱ्यावर शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांनी केला असून, त्यांना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आश्‍वासन आज मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी दिले आहे.

ओ. पनीरसेल्वम; लवकरच कारवाईचे आश्‍वासन

चेन्नई: जलिकट्टूप्रकरणी मरिना सुमद्र किनाऱ्यावर शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांनी केला असून, त्यांना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आश्‍वासन आज मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी दिले आहे.

आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याविषयी पनीरसेल्वम यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते एम. के. स्टॅलिन यांनी केली होती. यावर बोलताना पनीरसेल्वम म्हणाले, ""जलिकट्टूच्या समर्थनार्थ गेल्या आठवड्यापासून विद्यार्थी, तसेच तरुणवर्गाने सुरू केलेल्या आंदोलनात काही अपप्रवृत्तीच्या संघटना व व्यक्तींनी सहभागी होत आंदोलनाला वेगळे वळण लावण्याचे प्रयत्न केले. हे आंदोलन प्रजासत्ताक दिनापर्यंत लांबविण्याचा काही जणांचा प्रयत्न असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यामुळे आंदोलनादरम्यान हिंसक प्रकार घडले. आंदोलन करतेवेळी अशा लोकांनी देशविरोधी घोषणा देत तमिळनाडूच्या विभाजनाची मागणी केली. यामागील सूत्रधारांचा लवकरच शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील.''

काही समाजकंटकांनी आंदोलनाला हिंसक वळण देत पोलिसांवर हल्ला करून सामान्य नागरिकांचे आयुष्य धोक्‍यात टाकले. नागरिकांचा विचार करता पोलिसांनीही आपल्या बळाचा कमी वापर केला, असे पनीरसेल्वम यांनी सांगितले.

आंदोलनात लादेनची पोस्टर
जलिकट्टू आंदोलनात प्रजासत्ताक दिनाचा बहिष्कार करणाऱ्या होर्डिंग्जगबरोबर दहशतवादी ओसामा बिन लादेन याचे पोस्टर झळकल्याचे पुरावे आढळून आल्याची माहिती मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनी या वेळी दिली. काहींनी वेगळ्या तमिळनाडूचीही मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले.

"जलिकट्टू'प्रकरणी 31 ला सुनावणी
नवी दिल्ली ः पेटलेल्या जलिकट्टू प्रकरणावर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज होकार दर्शविला. न्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने आज यासंदर्भातील सर्व याचिकांवर 31 जानेवारीला सुनावणी घेण्याचे मान्य केले आहे. तमिळनाडू सरकारने 6 जानेवारी अध्यादेश काढून या खेळाला परवानगी दिल्यानंतर केंद्र सरकारने या अध्यादेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दरम्यान, याप्रकरणी तातडीने सुनावणी व्हावी, अशी मागणी करणारी जवळपास 70 कॅव्हेट सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहेत.

आंदोलनातील घडामोडी
- 76 ठिकाणी रास्ता रोको
- 12 हजार पाचशे नागरिक सहभागी
- 142 पोलिस कर्मचारी व 138 आंदोलक जखमी
- 66 गुन्हे दाखल; 215 जणांना अटक
- अनेक वाहनांचे आग व दगडफेकीत नुकसान

Web Title: Jalikattu try turning movement