'जलिकट्टू'च्या विधेयकाला विविध संघटनांचा विरोध

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 जानेवारी 2017

चेन्नई: तमिळनाडूत जलिकट्टूला परवानगी देणाऱ्या नवीन विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या संदर्भात प्राणी कल्याण मंडळ आणि प्राणी हक्क संघटनेने दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे.

न्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पीठाला याचिकेवर लवकर सुनावणी करण्याची मागणी करण्यात आली होती. पीठाने ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी आणि आनंद ग्रोव्हर यांना या संदर्भात अर्ज दाखल करण्याचे निर्देश दिले. 6 जानेवारी 2016 रोजी लागू केलेली अधिसूचना परत घेण्यासाठी केंद्राच्या याचिकेसह न्यायालय 30 जानेवारीला या अर्जावर सुनावणी घेणार आहे. प्राणी हक्क संघटनेने आपल्या अर्जात म्हटले, की जलिकट्टूच्या आयोजनाला परवानगी देणाऱ्या तमिळनाडू विधानसभेत मंजूर झालेले विधेयक म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या जुन्या आदेशाचे उल्लंघन होय.

Web Title: Jallikattu: Bill resistance to various organizations