जम्मूत बस दरीत कोसळून अपघात; 11 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था
शनिवार, 8 डिसेंबर 2018

जम्मू काश्मीरच्या पूँच जिल्ह्यात एका बसला भीषण अपघात झाला. या अपघातानंतर बस खोल दरीत कोसळल्याने बसमधील 11 जणांचा मृत्यू झाला. ही घटना पूँच जिल्ह्यातील लोरण येथे घडली.

जम्मू : जम्मू काश्मीरच्या पूँच जिल्ह्यात एका बसला भीषण अपघात झाला. या अपघातानंतर बस खोल दरीत कोसळल्याने बसमधील 11 जणांचा मृत्यू झाला. ही घटना पूँच जिल्ह्यातील लोरण येथे घडली. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.

पूँच जिल्ह्यातून ही बस पूँचपासून लोरण येथून जात होती. त्यादरम्यान या बसला अपघात झाला. या अपघातानंतर ही बस मंडी प्लेरा येथील खोल दरीत कोसळली. या बसमध्ये 17 प्रवासी होते. त्यापैकी 11 प्रवाशांचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर बचावपथक घटनास्थळी तातडीने रवाना झाले. यातील जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर पुढील वैद्यकीय उपचार केले जात आहे. यातील 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच यातील काही जखमींना विमानातून जम्मू येथे उपचारांसाठी नेण्यात आले. 

Web Title: In Jammu and Kashmir 11 dead after bus falls in gorge in Poonch district